मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Ratnagiri Fire: लोटे MIDCमध्ये अग्नितांडव, तिघांचा होरपळून मृत्यू तर 7 गंभीर जखमी

Ratnagiri Fire: लोटे MIDCमध्ये अग्नितांडव, तिघांचा होरपळून मृत्यू तर 7 गंभीर जखमी

Representative Image

Representative Image

Ratnagiri Lote MIDC Fire: रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीत केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी, 18 एप्रिल: रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri District) लोटे औद्योगिक वसाहती (Lote MIDC)मधील प्लॉट नंबर 15 येथील श्री समर्थ इंजिनिअरिंग केमिकल कंपनीत (Shree Samarth Engineering Chemical Company) रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन भीषण आग (Fire) लागली. ही आग इतकी भीषण होती की त्यात तीन जणांचा होरपळून मृत्यू (3 died) झाला आहे तर सात जण गंभीररित्या जखमी (7 injured) झाले आहेत. गंभीर जखमी असलेल्यांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या रुग्णांना अधिक उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आले आहे.

रविवारी (18 एप्रिल 2021) रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. लोटे एमआयडीसीतील श्री समर्थ इंजिनिअरिंग या कंपनीतील इसलॅशम प्लान्टमध्ये अति ज्वलनाग्राही सॉल्व्हन्ट केमिकल असलेल्या रिअ‍ॅक्टरचे अचानक टेम्प्रेचर वाढले आणि स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की एमआयडीसी परिसर पूर्णपणे हादरून गेला. या स्फोटानंतर कंपनीत आग लागली. यावेळी कंपनीत 9 कर्मचारी काम करत होते त्यापैकी सहा कर्मचारी भाजलेल्या अवस्थेत कंपनीबाहेर पडले मात्र तीन कर्मचारी त्या ठिकाणी अडकून पडले.

वाचा: Corona: मुंबईमध्ये बेड शोधण्यासाठी धावपळ करताय? आता केवळ एका क्लिकवर घरबसल्या मिळवा संपूर्ण माहिती

तब्ब्ल अडीच तास कंपनीत स्फोट होत होते भीषण लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या. सोबतच पाच पाण्याचे टँकरही पोहोचले होते. अग्निशमन दलाच्या पथकाने मोठ्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या अपघातात तीन कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले.

या अपघातात कंपनीतील विलास कदम , सचिन थरवळ, आणि जानकर या तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर परवेज आलम, ओंकार साळवी, रामचंद्र बहुतुले, विश्वास शिंदे, विलास खरावत, निलेश आखाडे या सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी ओंकार साळवी, रामचंद्र बहुतुले, विश्वास शिंदे, विलास खरावत या चौघांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना तात्काळ सांगली येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर जखमींमध्ये मदतकार्य करणाऱ्या अन्य एका इसमाचा देखील समावेश असून त्यालाही परशुराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

First published:
top videos

    Tags: Fire, Maharashtra, Ratnagiri