हिंगोली, 12 नोव्हेंबर: हिंगोली (Hingoli) जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव याठिकाणी एका गुरांच्या गोठ्याला भीषण आग (Massive fire at herd) लागल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री आठच्या सुमारास लागलेल्या या आगीत दहा जनावरांचा बांधलेल्या ठिकाणीच होरपळून मृत्यू (10 animals died in massive fire) झाला आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे बांधलेल्या जनावरांना स्वत:ची सुटका देखील करता आली नाही. या आगीच्या घटनेत संबंधित शेतकऱ्याचं तब्बल दहा लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.
कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुद्दाम जनावरांच्या गोठ्याला आग लावली असल्याचा संशय पीडित व्यक्तीने व्यक्त केला आहे. सेनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. गोठ्यातील चित्र पाहून पोलीसही हैराण झाले आहे. अशा विचित्र घटनेत लाखो रुपये किमतीची जिवंत जनावरं जळून मेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा-मैत्री हरली! रिक्षातून 50 लाखांचे दागिने घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याचा केला घात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील रहिवासी असणाऱ्या सचिन बोलवार यांच्या जनावरांच्या गोठ्याला काल रात्री आठच्या सुमारास आग लागली होती. आगीची माहिती मिळताच बोलवार यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण आग आटोक्यात आणता आली आहे. त्यामुळे काही मिनिटातच दहा जनावरं बांधलेल्या ठिकाणीचं जळून खाक झाली आहेत.
हेही वाचा-मित्राच्या वाढदिवसाला गेले अन्..; दुर्दैवी घटनेत जीवलगानं डोळ्यादेखत सोडला प्राण
या आगीत चार म्हशी, दोन गिर गाई, दोन बैल, दोन वासरे आणि एक कुत्र्याचा होरपळून मृत्यू झाला आहे. यासोबतच गोठ्यातील शेतीचं साहित्य आणि सोयाबीनची काही पोती आगीत भस्मसात झाली आहे. यामध्ये बोलवार याचं एकूण अंदाजे दहा लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलीस आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Fire