मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शेतातील गंजीला अचानक लागली आग, वृद्ध दाम्पत्याचा अक्षरश: झाला कोळसा

शेतातील गंजीला अचानक लागली आग, वृद्ध दाम्पत्याचा अक्षरश: झाला कोळसा

लांडे दाम्पत्य गेल्या 20 वर्षांपासून आपल्या मुलांपासून वेगळे राहत असल्याची माहिती मिळाली आहे.

लांडे दाम्पत्य गेल्या 20 वर्षांपासून आपल्या मुलांपासून वेगळे राहत असल्याची माहिती मिळाली आहे.

लांडे दाम्पत्य गेल्या 20 वर्षांपासून आपल्या मुलांपासून वेगळे राहत असल्याची माहिती मिळाली आहे.

बुलडाणा, 13 जून: शेतातील कपाशीच्या पऱ्हाटीच्या गंजीला आग लागून त्यात वृद्ध दाम्पत्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आग एवढी भीषण होती की, दाम्पत्याच्या मृतदेहाचा अक्षरश: कोळसा झाला आहे. जयपूर लांडे शिवारात शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

श्रीकृष्ण लांडे (वय-75 व सईबाई लांडे (वय-7) असं मृत दाम्पत्याचं नाव आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गंजीला आग लागून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आही. तरी लांडे दाम्पत्यानं आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

हेही वाचा...कोरोना संसर्गामुळे मृत्यू ओढावलेल्या व्यक्तीबाबत सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

मिळालेली माहिती अशी की, श्रीकृष्ण लांडे व सईबाई लांडे हे रोजच्या प्रमाणे सकाळी शेतामधे काम करण्यासाठी गेले होते. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांचा पुतण्या व मुलगा भानुदास लांडे शोधायला शेताकडे गेले असता त्यांना शेतातील कपाशीच्या पराटीच्या गंजीमध्ये दोघेही जळलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी लगेच शहर पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार सुनील अंबुलकर घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन शवविच्छेदनास पाठवण्यात आला होता.

हेही वाचा... अरे बापरे! शेतातील धुऱ्याचा वाद पेटला, 2 सख्ख्या भावांची निर्घृण हत्या

लांडे दाम्पत्य गेल्या 20 वर्षांपासून आपल्या मुलांपासून वेगळे राहत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांनी वेगळाच संशय वर्तवला आहे. लांडे दाम्पत्यानं आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली? या दिशेने पोलिस तपास करत आहे. याप्रकरणी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सुनील अंबुलकर यांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Vidarbha