प्रेमाच्या भावविश्वात रममान झालेल्या प्रेमीयुगुलास बेदम मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

प्रेमाच्या भावविश्वात रममान झालेल्या प्रेमीयुगुलास बेदम मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

प्रेमाच्या भावविश्वात रममान झालेल्या प्रेमीयुगुलाला बेदम मारहाण करण्यात आली होती. तरुणीच्या नातेवाईकांनीच ही मारहाण केल्याचे समोर आले आहे

  • Share this:

अमोल गावंडे, बुलडाणा,19 एप्रिल- बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा बस स्टॅन्ड परिसरात प्रेमीयुगुलास बेदम मारहाण करणाऱ्या दोघांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मारहाण झालेल्या युवकाने नांदुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वाचा काय आहे हे प्रकरण?

गेल्या १५ एप्रिल रोजी ही घटना नांदुरा बसस्थानकावर दुपारी २ वाजताच्या घडली होती. प्रेमाच्या भावविश्वात रममान झालेल्या प्रेमीयुगुलाला बेदम मारहाण करण्यात आली होती. तरुणीच्या नातेवाईकांनीच ही मारहाण केल्याचे समोर आले आहे.मुलीच्या प्रेमप्रकरणाची माहिती तिच्या नातेवाईकांना लागली होती. मुलीला समज देवूनही ती तिच्या प्रियकराला भेटतच होती. मुलीच्या नातेवाईकांनी दोघांवरही पाळत ठेवली. बस स्टॅन्डवर दोघे बोलत बसल्याचे दिसताच तिच्या नातेवाईकांनी दोघांना बेदम मारहाण केली. यामुळे नांदुरासह परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रेमीयुगुलाला मारहाण होत असताना बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या लोकांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली होती.

प्रेमीयुगुलाला अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

काय म्हणतात पोलीस?

सामाजिक प्रतिष्ठेतून हा प्रकार घडल्याचे नांदु-याचे पोलिस निरिक्षक सारंग नवलकार यांनी सांगिचले आहे. याबाबत पोलिसानी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

First published: April 19, 2019, 6:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading