उदयनराजे समर्थकांचे धाबे दणाणले, पोलिसांनी दाखवला हिसका

उदयनराजे समर्थकांचे धाबे दणाणले, पोलिसांनी दाखवला हिसका

सुनील काटकर यांच्यासह अ‍ॅड.विकास पवार, पंकज चव्हाण, अ‍ॅड.अंकुश जाधव, ड्रायव्हरवर अपहरण, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

  • Share this:

किरण मोहिते,प्रतिनिधी

सातारा, २२ एप्रिल- राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थकांवर अपहरण, जीवे मारण्याची धमकी आणि अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांच्यासह पाचजणांवर सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदयनराजे भोसले यांचे समर्थक सुनील काटकर यांच्यावर अभिजित बिचुकले यांचे गाडीतून अपहरण करुन त्यांना प्रचार न करण्यासाठी धमकावल्याच्या आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. काटकर यांच्यासह अ‍ॅड.विकास पवार, पंकज चव्हाण, अ‍ॅड.अंकुश जाधव, ड्रायव्हरवर अपहरण, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

'फाईट' करणाऱ्या उदयनराजे समर्थकांना पोलिसांचा हिसका

दरम्यान, 'फाईट' या चित्रपटाच्या प्रेसदरम्यान केलेला तोडफोडीचा स्टंट उदयनराजे समर्थकांच्या चांगलाच अंगलट आला होता. चित्रपटाची फुकट प्रसिद्धी व्हावी अशी भाबडी आशा ठेऊन हा स्टंट केल्याची चर्चा साताऱ्यात रंगली. परंतु, स्टंट करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच हिसका दिला होता.

'फाईट' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी डिसेंबर २०१८ मध्ये चित्रपटाच्या पत्रकार परिषदेदरम्यान गाडीची तोडफोड आणि फ्लेक्स बोर्ड फाडले होते.

First published: April 22, 2019, 6:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading