विधानसभेच्या निकालापूर्वीच काढली विजयी मिरवणूक, NCPच्या 'या' उमेदवारावर गुन्हा

संजय कदम यांची पत्नी सायली कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे देखील मिरवणुकीत झाले सहभागी...

News18 Lokmat | Updated On: Oct 23, 2019 01:13 PM IST

विधानसभेच्या निकालापूर्वीच काढली विजयी मिरवणूक, NCPच्या 'या' उमेदवारावर गुन्हा

रत्नागिरी,23 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकांचा निकाल उद्या, 24 ऑक्टोबरला मतमोजणीनंतर जाहीर होणार आहे. मात्र, निकालापूर्वीच विजयी मिरवणूक काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार अडचणीत सापडला आहे. खेड दापोलीचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे संजय कदम यांच्यासह पत्नी सायली कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विधानसभेचे मतदान 21 ऑक्टोबरला पार पडल्यानंतर संजय कदम यांचे काही समर्थक खेड येथे जमा झाले. सगळ्यांनी संजय कदम विजयी होणार असल्याचा दावा करत खेड ते भरणे नाका याठिकाणी विजयी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी कदम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना समज दिली. मात्र, तरीही ही मिरवणूक बंद न करता ती सुरु ठेवली. त्यांनंतर संजय कदम यांना ताबडतोब ही मिरवणूक रद्द करायला लावली. मात्र, त्या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर संजय कदम यांनी ही मिरवणूक पुन्हा काढल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केली. संजय कदम यांची पत्नी सायली कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे देखील मिरवणुकीत सहभागी झाले होते.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निवडणूक आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी संजय कदम यांच्यावर खेड पोलिसांत कलम 143, 147, 149, 268, 290 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर पुण्यातील खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांच्या समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली. त्यानंतर शिवाजीनगर येथील भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनीही स्वत:च आपल्या विजयावर शिक्कामोर्तब करत फटाके फोडल्याचे पाहायला मिळाले.

भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांचे सुपुत्र सिद्धार्थ शिरोळे हे शिवाजीनगर मतदरासंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात आहेत. भाजपने सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांना पक्षांतर्गत विरोधाचा 'सामना' करावा लागला होता. त्यामुळे ही निवडणूक सिद्धार्थ शिरोळे यांना अवघड जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता मतदानानंतर निकालाआधीच सिद्धार्थ शिरोळे यांनी विजयी मिरवणूक काढली आहे. दुसरीकडे, खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने निकालापूर्वीच विजयाचे होर्डिंग्ज झळकावलेत. सचिन दोडके आमदारपदी निवड झाल्याबद्दल वारज्यामध्ये बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे लोकसभेला सुप्रिया सुळे या मतदारसंघातून पिछाडीवर होत्या. तरीही विधानसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवारानं निकालाआधीच विजयाचा दावा केला.

Loading...

VIDEO: EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 01:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...