जेव्हा कुंपणच शेत खातं! पोलिसांनी हिसकावली चक्क मासोळी विक्रेत्यांची रोख रक्कम

जेव्हा कुंपणच शेत खातं! पोलिसांनी हिसकावली चक्क मासोळी विक्रेत्यांची रोख रक्कम

अल्लीपूर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मासोळी विक्रेत्यांचा हिशेब सुरु असताना त्यांची रोख रक्कम हिसकावल्याचा पोलिसांवर आरोप आला आहे.

  • Share this:

वर्धा, ३० एप्रिल- अल्लीपूर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मासोळी विक्रेत्यांचा हिशेब सुरु असताना त्यांची रोख रक्कम हिसकावल्याचा पोलिसांवर आरोप आला आहे. मासोळी विक्रेत्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस कर्मचाऱ्यांविरोधीत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  राजरत्न खडसे आणि सचिन सुरकार अशी आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

काय आहे हे प्रकरण?

कात्री येथे आठवडी बाजार झाल्यानंतर मासोळी विक्रेत्यांचा हिशेब सुरु होता. तिथे दोन पोलीस कर्मचारी आले. त्यांनी चक्क मासोळी विक्रेत्यांच्या रकमेवर डल्ला मारला. नागरिकांनी त्यांना चोर समजत चोप दिला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून 15 ते 20 जमावावर गुन्हा दाखल केला होता. जुगार असल्याच्या संशयावरुन रक्कम हिसकावल्याचा पोलीस कर्मचाऱ्यांनी बनाव केला होता.

VIDEO: अमृता फडणवीसांनी घेतली मुंबई पालिका आयुक्तांची भेट

First published: April 30, 2019, 8:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading