धनंजय मुंडेंसह 14 जणांविरोधात इनामी जमीन हडपल्याप्रकरणी गुन्हा दाखल

धनंजय मुंडेंसह 14 जणांविरोधात इनामी जमीन हडपल्याप्रकरणी गुन्हा दाखल

या प्रकरणात एकूण 14 आरोपींवर गुन्हा दाखल झाला. यात धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे, प्रेमा पुरुषोत्तम केंद्रे आदीसह 14 जणांचा समावेश आहे. यात धनंजय मुंडे हे दहाव्या क्रमांकाचे आरोपी आहेत.

  • Share this:

बीड, 14 जून- इनामी जमीन बेकायदेशीररीत्या हडपल्याप्रकरणी अखेर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबेजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणात एकूण 14 आरोपींवर गुन्हा दाखल झाला.  यात धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे, प्रेमा पुरुषोत्तम केंद्रे आदीसह 14 जणांचा समावेश आहे. यात धनंजय मुंडे हे दहाव्या क्रमांकाचे आरोपी आहेत.

जगमीत्र साखर कारखान्याला जमीन खरेदी करतांना बेलखंडी मठाच्या इनामी जमिनीची बेकायदेशीर खरेदी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.औरंगाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि  न्यायमूर्ती  के. के. सोनवणे यांनी 11 जूनला या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या निकालाला आव्हान देत धनंजय मुंडे  यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. आता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील जुने सर्व्हे क्रमांक 24, 25 आणि इतर शासकीय जमीन आहे. ही जमीन बेळखंडी मठाला इनाम म्हणून देण्यात आली होती. या मठाचे महंत रणजित व्यंका गिरी यांच्या निधनानंतर मठाची या 17 एक्कर 32 गुंठे जमीन शासनाच्या परवानगीशिवाय धनंजय मुंडे यांनी बेकायदेशीररित्या स्वत:च्या नावावर करून घेतली, असा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठात याचिका दाखल केली होती.

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी मठाची ही जमीन आपल्या नावे असल्याचे दावे दाखल केले. त्याआधारे त्यांनी स्वत:च्या नावे हुकूम काढून घेतले. यानंतर धनंजय मुंडे यांनी  मुखत्यारनाम्यांआधारे खरेदी केली आणि त्यावर अकृषक (एन.ए) कर लावून घेतला असा राजाभाऊ फड यांनी आरोप केला होता. या व्यवहाराबाबत शासनाला शासनाला काहीच कल्पना नव्हती. फड यांनी या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही ज्यामुळे फड यांनी हायकोर्टाचे दार ठोठावले होते.अखेर यात कलम 420, 468, 465 464 , 471 या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडेंवरील हा दुसरा फसवणुकीचा गुन्हा आहे. यापूर्वी 8 सप्टेंबर 2015 ला यापूर्वी मुंजा गीते या शेतकऱ्यांच्या फिर्यादी वरून फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील दोषारोप अंबेजोगाई सेशन कोर्टात दाखल आहे. 7 एकर 34 गुंठे जमीन 50लाख रुपयाला विकत घेतली होती. त्या व्यवहारातील 41 लाखांचे बँकेचे चेक बाऊन्स झाले होते.अद्याप त्या शेतकऱ्याला व्यवहारातिल रक्कम मिळाली नाही. त्या संदर्भात गुन्हा दाखल आहे.पुढील तपास बर्दापूरचे पोलीस करत आहे. या प्रकरणामुळे धनंजय मुंडें पुन्हा एकदा अडचणीत सापडेल आहेत.

- कारखान्याला लागणारी एकूण - जमीन 70 एकर (शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार)

- 42 एकरची रजिस्ट्री झाली.(या प्रकरणात 15ते 20 शेतकरी ज्यांचे पैशे मिळाले नाहीत)

- बेलखंडी मठाची 17 एकर 34 गुंठे जमीन आहे. (पूस गावातील शेतकऱ्यां कडून विकत घेतलीय मात्र शेतकऱ्यांकडे ती 99वर्षांच्या करारावर देण्यात आली होती.)

- मुंजा गीते नावाच्या शेतकऱ्याची 7 एकर 32 गुंठे -50 लाखा ठरली होती. पैकी 9 लाख रोख दिले तर, बाकी चेक दिले होते. चेक बाऊंस झाले.

मुंबईत उड्डाणपुलाखाली भीषण अग्नितांडव, गाड्या जळून खाक

First published: June 14, 2019, 11:42 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading