अवैध जीएम बियाणे विकणाऱ्या पाच  कंपन्यांविरूद्ध एफआयआर दाखल

अवैध जीएम बियाणे विकणाऱ्या पाच  कंपन्यांविरूद्ध एफआयआर दाखल

बाळभद्र, जादु, एटीएम, कृष्णा गोल्ड आणि अर्जुन अशा या बियाणे कंपन्यांची नावं आहेत.

  • Share this:

नागपूर, 27 ऑक्टोबर: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना परवानगी नसलेल्या जीएम बियाणे विकणाऱ्या पाच बियाणे कंपन्यांविरोधात नागपूरात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. बाळभद्र, जादु, एटीएम, कृष्णा गोल्ड आणि अर्जुन अशा या बियाणे कंपन्यांची नावं आहेत.

देशात मान्यता नसताना राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हर्बिसाईड टॉलरन्ट या तंत्रज्ञानावर आधारीत जीएम बियाणे विकल्याप्रकरणी राज्याच्या कृषी आयुक्तांनी पाच बियाणे कंपन्यांवर नागपूरात एफआयआर दाखल केली. पंतप्रधान कार्यालयाने कापूस उत्पादकांना जेनेटिकली माँडिफाईड बियाणे विकून होणाऱ्या लुटी संदर्भात दखल घेतली होती. यानंतर केंद्र सरकारने जेनेटिकली माँडिफाईड पद्धतीने लागवड होणाऱ्या कापसासंदर्भात एका आढावा बैठक आयोजीत केली होती. यात जवळपास आठ राज्यात ३५ लाख अशा प्रकारे कापसाचे जीएम बियाणे अवैधपणे विकल्याच पुढे आल होत.

यांसदर्भात राज्याच्या कृषी आयुक्तांनी नागपूरात पाच बियाणे कंपन्यांवर एफआआर दाखल करून या कंपन्यांनी परवानगी नसतांना हे बियाणे कसे काय विकले याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2017 10:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading