पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 16 जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 16 जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 16 जणांविरुद्ध पालकमंत्री मदन येरावार यांचंसह 16 जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश यवतमाळ न्याय दंडाधिकाऱ्यांनी (प्रथम श्रेणी) दिले आहेत. शहरातील मुख्यवस्तीमधील जागेचे बनावट कागदपत्रे तयार करून विक्री केल्याचा मदन येरावार यांच्यावर आरोप आहे.

  • Share this:

भास्कर मेहरे (प्रतिनिधी)

यवतमाळ, 15 मे- पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 16 जणांविरुद्ध पालकमंत्री मदन येरावार यांचंसह 16 जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश यवतमाळ न्याय दंडाधिकाऱ्यांनी (प्रथम श्रेणी) दिले आहेत. शहरातील मुख्यवस्तीमधील जागेचे बनावट कागदपत्रे तयार करून विक्री केल्याचा मदन येरावार यांच्यावर आरोप आहे.

मदन येरावार यांच्यासह 16 जणांवर 420,426,465,468,471 r/w34 आणि 120 (ब) कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हेसह 12 जणांनी मिळून तत्कालीन भूमिअभिलेख उपअधीक्षक, सहायक दुय्यम निबंधक यांच्या साहाय्याने जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून पालकमंत्री मदन येरावार,अमित चोखानी यांना मालमत्ता हस्तांतरित केली.

त्यामुळे आयुषी किरण देशमुख यांनी न्यायालयात धाव घेतली होती. बुधवारी आयुषी देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी केली. न्यायालयाने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

यवतमाळमधील पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह भाजप नेते आणि जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, जयश्री ठाकरे, विजयश्री कारेकर, जयंत कोल्हे, राजश्री संजय देवतळे, तेजश्री थुटे, दिलीप कोल्हे, अर्चना कोल्हे, आशिष कोल्हे, वैशाली कोल्हे, अमोल कोल्हे, शीतल धोटे, अमित चोखानी, तत्कालीन भूमिअभिलेख अधिकारी, तत्कालीन नगर परिषद सीईओ आदींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गायब झालेल्या पतीला पाहून पत्नी भडकली, नवऱ्याला मारतानाचा VIDEO व्हायरल

First published: May 15, 2019, 8:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading