हाच 'तो' व्हिडिओ ज्यामुळे उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंविरोधात झाला गुन्हा दाखल

हाच 'तो' व्हिडिओ ज्यामुळे उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंविरोधात झाला गुन्हा दाखल

उदयनराजे भोसले यांच्यासह सहा समर्थकांवर आणि जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आमदार शिवेंद्रसिह राजे भोसले या दोन्ही राजांसह 70 ते 75 समर्थकांवर गुन्हा दाखल झाला

  • Share this:

विकास भोसले, प्रतिनिधी

सातारा,23 आॅक्टोबर : जुना मोटार स्टँड येथील भाड्याने असलेल्या देशी दारूचे दुकान काढण्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह सहा समर्थकांवर आणि जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आमदार शिवेंद्रसिह राजे भोसले या दोन्ही राजांसह 70 ते 75 समर्थकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

काल सोमवारी साताऱ्यात झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिसांनी जमावबंदी आदेश भंग केल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आणि त्यांच्या 70 ते 75 समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसंच दारू दुकानाचे मालक रवींद्र ढोणे यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या सहा समर्थकांविरोधात जबरदस्तीने दारू दुकान बंद करायला लावण्याची तक्रार दिली आहे.

"दुकान बंद करा नाहीतर दुकान फोडीन, मी दुकान फोडायला आलोय, तू गाडीत बसून निघून जा. नाहीतर तुझी गाडी फोडीन, तुझ्या शिवेंद्रला बोलावं कोणीबी येऊ दे तुझे दुकान पडणारच. तुझे दुकान बंद कर नाहीतर तुला खल्लास करीन," अशी धमकी उदयनराजे यांनी दिल्याचं ढोणे यांनी फिर्यादीत म्हटलं आहे.

त्यानुसार पोलिसांनी गर्दी, मारामारी या आरोपाखाली भा. द.वी कलम 143,149, 506 नुसार खासदार उदयनराजे भोसले, समीर खुटाळे, सत्यजित खुटाळे, केदार राजेशिर्के, महेश शिंदे, मयूर चिकणे, पद्माकर खुटाळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

===============================

VIDEO : कार नव्हे, उदयनराजेंनी डंपर घेऊन शहरात मारला फेरफटका

First published: October 23, 2018, 4:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading