पोलिसांच्या वेशभूषेत प्रॅंक व्हिडिओ बनवणं पडलं महागात, चार जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांच्या वेशभूषेत प्रॅंक व्हिडिओ बनवणं पडलं महागात, चार जणांवर गुन्हा दाखल

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू असताना पोलिसांच्या वेशभूषेत दुचाकीवर फिरून प्रँक व्हिडीओ बनवून तो युट्युबवर प्रसिद्ध करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

सोलापूर, 1 एप्रिल: कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू असताना पोलिसांच्या वेशभूषेत दुचाकीवर फिरून प्रँक व्हिडीओ बनवून तो युट्युबवर प्रसिद्ध करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर शहरच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

संचारबंदीच्या काळात या चौघा तरुणांनी 'एमएच.13 वाईन्स' या यूट्यूब चॅनलसाठी प्रँक व्हिडिओ बनवला. सोशल मीडियावर आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा...मरकजमध्ये सामील झालेले 50 जण मुंबईत आल्याने धोका वाढला, पोलिसांकडून शोध सुरू

या व्हिडिओमध्ये पोलिसांच्या वर्दीप्रमाणे खाकी कपडे घालून दुचाकीवरून गस्त घालत, गल्लीबोळात फिरून लोकांना पळवून लावतात. तसेच लोकांवर काठी उगारताना व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. यात वेगवेगळी गाणीही लावली आहेत. तसेच व्हिडिओमध्ये आरोपी तरुण लोकांना अन्नदान करीत असल्याचेही दाखवले आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार अभय शिंदे, दीपक मोहन जाधव, अजित बिराजदार आणि ऋषिकेश महागावकर अशी आरोपींची नावं आहेत. या चौघांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात केल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे अन्वेशन शाखा) आहे.

संजय जगताप यांनी दिली आहे.

हेही वाचा..कोरोनाच्या लढ्यात अझीम प्रेमजींच्या विप्रो ग्रुपकडून 1125 कोटींचे साहाय्य

दरम्यान, एप्रिल महिना म्हटलं की सगळ्यांना फूल बनवण्याचा महिना आहे. पण यंदा मात्र कोरोनामुळे देशावर खूप मोठं संकट आलं आहे. त्याचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण तरीदेखील नियमांचं उल्लंघन झालेलं आपण पाहिलं आहे. अशात 1 एप्रिलनिमित्त नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज एप्रिल फुल बनवण्याकरता टाकले जाऊ शकतात, यात जमावबंदी लागू आहे. त्यामुळे सरकारकडून कठोर निर्णय घेण्यात आले आहेत.

'एप्रिल फूल' नावाखाली चेष्टा करू नये. विनाकारण देशात संचारबंदी असताना चेष्टाचा विषय केला जाता कामा नये, असं आवाहान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. एप्रिल फूल नावाखाली कोणी चेष्टा केली त्यासंबधी कोणी पोलिसांकडे तक्रार केली तर पोलिस योग्य ती दखल घेतील. पण लोकांनी ही चेष्टेचा विषय करू नका परिस्थितीच गांभीर्य ओळखा, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.

हेही वाचा..दारूड्यांचा कहर, फोडले वाईन शॉप आणि चोरून नेले आवडीचे ब्रँड!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2020 05:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading