बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप, नगरसेवकावर गुन्हा दाखल

बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप, नगरसेवकावर गुन्हा दाखल

बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप विवाहित महिलेनं सय्यद मतीन याच्यावर केला होता.

  • Share this:

औरंगाबाद, 13 मे : औरंगाबादमधील नगरसेवक सय्यद मतीन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप विवाहित महिलेनं सय्यद मतीन याच्यावर केला होता.

सय्यद मतीन याच्यावर विवाहित महिलेनं अनेक दिवसांपूर्वीच बलात्काराचा आरोप केला होता. पण याप्रकरणी आता अखेर चाकण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतीन हा सतत कोणत्या ना कोणत्या वादात सापडत असतो. यामुळेच एमआयएमने त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती.

दरम्यान, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शोकसभेला विरोध केल्याने सय्यद मतीन हा वादात सापडला होता. शोकसभेला विरोध केल्याने सभागृहाताच भाजप नगरसेवकांनी मारहाण केली होती. त्यानंतर एमआयएमने असलेल्या सय्यद मतीनची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

वादानंतर मतीनला कायमची सभागृहबंदी करण्यात आलेली आहे. मतीनने नुकतंच एमआयएम नगरसेविकेसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. सय्यद मतीनच्या सततच्या वादग्रस्त वागणुकीने पक्ष अडचणीत येत असल्याने आमदार इम्तियाज जलील यांनी डिसेंबरमध्येच मतीनची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे.

SPECIAL REPORT: आग लागली तेव्हा घर आतूनही बंद होतं, श्रावणीच्या मृत्यूमागंचं सत्य काय?

First published: May 13, 2019, 9:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading