हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजप आमदारावर गुन्हा दाखल, चौघांना अटक

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजप आमदारावर गुन्हा दाखल, चौघांना अटक

भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून एक गाडी जप्त केली असून चौघांना अटक केली आहे.

  • Share this:

बालाजी निरफळ,

उस्मानाबाद, 30 डिसेंबर : भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. राणा पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील माळेवाडी बोरगाव या ठिकाणी जाऊन हिम्मतराव पाटील यांच्या घरी गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळंब पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीतील सदस्याला लपवून ठेवल्याचा आरोप राणा पाटील यांनी हिंमतराव पाटील यांनी केला होता. माळेवाडी ता माळशिरस येथे हिंम्मतराव पाटील यांच्या बंगल्यावर असलेले शिवसेनेचे  प.स. सदस्य पळवुन नेण्यासाठी हिंम्मतराव पाटील यांच्या बंगल्यात  घुसुन रिवॉल्वर रोखुन सदस्य देण्याची मागणी उस्मानाबाद भाजपाचे आमदार राणारणजितसिंह पदमसिंह पाटील व 11 जणांनी केली.  यातूनच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे राणा पाटील यांनी हिंमतराव पाटील यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनास्थळावरून राणा पाटील यांची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली.

याप्रकरणी सोलापूर ग्रामीणमधील अकलूज पोलिस ठाण्यात तुळजापूरचे आमदारासह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ग्रामस्थांनी पकडलेल्या 4 जणांना पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक यांच्यासह 4 जणांचा समावेश आहे.

वाचा : उद्धव ठाकरेंनी फिरवली 'भाकरी', प्रस्थापितांना डावलले, 'या' लोकप्रतिनिधींना संधी

 

First published: December 30, 2019, 9:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading