मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी! अनिल देशमुखांना CBI ने घेतलं ताब्यात, 100 कोटी खंडणी प्रकरणात होणार चौकशी

महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी! अनिल देशमुखांना CBI ने घेतलं ताब्यात, 100 कोटी खंडणी प्रकरणात होणार चौकशी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची पुन्हा चौकशी सुरू होणार आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची पुन्हा चौकशी सुरू होणार आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची पुन्हा चौकशी सुरू होणार आहे.

नागपूर, 24 एप्रिल: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची पुन्हा चौकशी सुरू होणार आहे. अनिल देशमुखांना नागपूर येथील घरात ताब्यात घेण्यात आले आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात CBI ने FIR दाखल केला आहे. 100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यानंतर नागपूर तसंच मुंबईतील त्यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. यावेळी नागपूरमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी अनिल देशमुख यांच्या सह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे 5 जण अनोळखी असल्याचे एफआयआर मध्ये नमुद करण्यात आले आहे. दरम्यान आरोपी या रकान्यात अनिल देशमुखांचेही नाव आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही अत्यंत मोठी घडामोड आहे. राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवर सीबीआयने एफआयआर दाखल केली आहे.

प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) सीबीआयला दिले होते. त्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग (former Mumbai Police Commissioner Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी सीबीआयने मुंबई-नागपूरसह विविध भागात छापेमारी केल्यानंतर अनिल देशमुखांना ताब्यात घेण्यात आले आहे.

(हे वाचा-मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रावर लसच नाही! BKC केंद्रावर मोठी गर्दी)

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये पोलिसांमार्फत वसुली करण्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी परबीर सिंग यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तसंच परमबीर सिंह यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांच्या जनहित याचिका तर डॉ. जयश्री पाटील यांची रिट याचिका या सर्व याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या होत्या. याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील (Petitioner Dr Jaishri Patil) यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करतांना असे म्हटले होते कि, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी.

या खटल्याची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे कि, अनिल देशमुख हे गृहमंत्री असल्याने पोलीस या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे, त्यानंतर आज सीबीआयने अनिल देशमुखांविरोधात FIR दाखल केला आहे.

First published: