मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अखेर 'लवकरच'च्या चर्चेला पूर्णविराम; मंत्रिमंडळ विस्ताराची अधिकृत घोषणा जारी

अखेर 'लवकरच'च्या चर्चेला पूर्णविराम; मंत्रिमंडळ विस्ताराची अधिकृत घोषणा जारी

 उद्या 9 ऑगस्ट, मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवन येथे राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.

उद्या 9 ऑगस्ट, मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवन येथे राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.

उद्या 9 ऑगस्ट, मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवन येथे राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 8 ऑगस्ट :  शिंदे गट आणि भाजप सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. पण अखेर आता उद्या मंगळवारी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त मिळाला आहे. मंगळवारी सकाळी शिंदे गटातील आणि भाजपमधील नेत्यांना शपथ दिली जाणार  आहे. भाजप आणि शिंदे गटातून काही नावं ही निश्चित झाली आहे. ज्यांना निरोप भेटला ते नेते मुंबईकडे रवाना झाले आहेत. ( Shinde governments cabinet expansion) पण यामध्ये शिंदे गटातील आणि टीईटी घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेले अब्दुल सत्तार यांना अजूनही निरोप मिळालेला नाही. याशिवाय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अधिकृत घोषणा जारी करण्यात आली आहे. उद्या 9 ऑगस्ट, मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवन येथे राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून याबाबत सूचना जारी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपातून अतुल सावे यांना देखील फोन करण्यात आले. ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. भाजपाची नावे खालील प्रमाणे : १) चंद्रकांत दादा पाटील २) राधा कृष्ण विखे पाटील ३) सुधीर मुनंगटीवार ४) गिरिष महाजन ५) सुरेश खाडे, मिरज ६) अतुल सावे या सहा जणांना मंत्रिमंडळात जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर शिंदे गटातून शंभूराजे देसाई, संजय शिरसाट,अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावं समोर आली आहे. जे शिवसेनेमध्ये मंत्री होते त्यांनाच मंत्रिपद दिले जात आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे. काही नावावर फेरविचार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक सुरू आहे. सध्याच्या राजकीय घड़ामोड़ीमुळे काही नावावर फेरविचार होऊ शकतो. कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता मंत्रिमंडळात असाचा अशी दोघांची इच्छा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
First published:

Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde

पुढील बातम्या