मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /94 पेक्षा जास्त प्लॉटधारकांना घातला कोट्यवधींचा गंडा, घोटाळेबाज तलाठ्याला ठोकल्या बेड्या

94 पेक्षा जास्त प्लॉटधारकांना घातला कोट्यवधींचा गंडा, घोटाळेबाज तलाठ्याला ठोकल्या बेड्या

महसूलचा निलबिंत तलाठी म्हणून बहुचर्चेत असलेला राजेश चोपडे याने तब्बल 94 प्लॉटचे मूळमालक बदलून ते प्लॉट परस्पर विक्री करून कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे

महसूलचा निलबिंत तलाठी म्हणून बहुचर्चेत असलेला राजेश चोपडे याने तब्बल 94 प्लॉटचे मूळमालक बदलून ते प्लॉट परस्पर विक्री करून कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे

महसूलचा निलबिंत तलाठी म्हणून बहुचर्चेत असलेला राजेश चोपडे याने तब्बल 94 प्लॉटचे मूळमालक बदलून ते प्लॉट परस्पर विक्री करून कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे

अमोल गावंडे,(प्रतिनिधी)

बुलडाणा,7 फेब्रुवारी:अखेर घोटाळेबाज तलाठ्याला तब्बल 2 महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने तब्बल 94 पेक्षा जास्त प्लॉट धारकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. प्लॉटचा मूळ मालकच बदलून तलाठ्याने प्लॉटची परस्पर विक्री केली. राजेश चोपडे असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तलाठ्याला अभय होते. त्यामुळे आरोपी 17 वर्षे एकाच शहरात कार्यरत आहे.

महसूलचा निलबिंत तलाठी म्हणून बहुचर्चेत असलेला राजेश चोपडे याने तब्बल 94 प्लॉटचे मूळमालक बदलून ते प्लॉट परस्पर विक्री करून कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मूळ प्लॉटधारकांची फसवणूक झाली आहे. एव्हढेच नव्हे तर चोपडे याने महसूलच्या शासकीय दस्ताएवजातही ही फेरफार केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी महसूल विभागाने महिन्यभरापूर्वी खामगाव पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, आरोपी तलाठी चोपडे गुन्हा दाखल झाल्यावर फरार झाला होता. शुक्रवारी अखेर चोपडेला पोलिसांनी जेरबंद केले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहराचा आरोपी असलेला निलंबित तलाठी राजेश चोपडे हा भाग-1 चा तलाठी म्हणून 2015 पासून कार्यरत होता. तर एकाच महसूल मंडळात 17 वर्षांपासून असल्याने याकाळात त्याने आपल्या सजातील गृहनिर्माण सोसायट्यांनी वितरित केलेलया प्लॉटचे मूळमालक बदलून त्याजागी आपल्या मर्जीतील व्यक्तींचे नावे ऑनलाईन प्रणालीद्वारे टाकले. तसेच शहरातील इतरही काही प्लॉटचे मूळमालक बदलून त्या प्लॉटची परस्पर विक्री केली. हा प्रकार जवळपास 2019 पर्यन्त सर्रास सुरु होता. शिवाय महसूल विभागातील शासकीय दस्ताऐवजातही त्याने फेरफार केली. यासंदर्भात 2 प्लॉटधारकांनी महसूल विभागाकडे आणि पोलिसांकडे फसवणुकीच्या तक्रारी केल्या. महसूल विभागाने याची चौकशी समितीद्वारे चौकशी करून अहवाल बनवला आणि वरिष्ठांकडे सादर करतच तलाठी चोपडेला 5 डिसेंबरला तडकाफडकी निलंबित करण्यात आले. नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून या प्रकरणात त्यावेळी गुन्हे दाखल झाले आहेत. तर तहसीलदार यांनी मंडळ अधिकाऱ्यामार्फत पोलिसांत त्यावेळी 8 जानेवारीला सुद्धा निलंबित तलाठी यांच्याविरोधात 94 प्लॉटमध्ये गैरप्रकार आणि शासकीय कागदपत्रांची खोडतोड केली असल्याची तक्रार दिली होती.तर अजूनही चोपडेंच्या कार्यकाळातील प्लॉटची चौकशी सुरु असून या प्रकारांची व्याप्ती फार मोठी असल्याचे तहसीलदार शीतल रसाळ यांनी सांगितले आहे. ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे त्यांनी देखील तलाठी चोपडेंच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

महसूल विभागाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी निलंबित तलाठी राजेश चोपडेविरुद्ध कलम 409, 420,468,471 भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे एवढे गंभीर गुन्हे दाखल होऊनही तलाठी राजेश चोपडे तेव्हापासून फरार होता. पोलिसांनी पथक तयार करून त्याला परजिल्ह्यात शोधले. मात्र, आरोपी हातात येत नव्हता. अखेर आरोपीला शुक्रवारी खामगाव शहरात अटक करण्यात आली.

निलंबित तलाठी चोपडेंच्या कारनाम्याने संपूर्ण महसूल विभाग हादरले असून याप्रकरणी आणखी आरोपी याप्रकरणात वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. महसूल विभागातील काही अधिकारी, कर्मचारी सुद्धा यामध्ये सहभागी असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी करून फसवणूक झालेल्या प्लॉट मालकांना न्याय द्यावा, महसूलमधील ही घोटाळेबाज बाहेर काढावे, अशी मागणी केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Buldana, Crime news, Khamgaon, Latest news, Maharashtra news