Home /News /maharashtra /

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही लक्षात आलं व्हिजन

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही लक्षात आलं व्हिजन

शिवसेनेनं त्यावेळी समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध केला. आता मात्र ते बाजूने आहेत याचे समाधान आहे.

मुंबई, 6 डिसेंबर: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray)यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केली. कामाचा आढावा घेतला. याबाबत आनंद आहे. त्यांना देखील व्हिजन लक्षात आलं की कशा पध्दतीनं महाराष्ट्र बदलू शकतो, असं विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadanvis) यांनी सांगितलं. महाराष्ट्राचा मागास भाग मुंबईशी जोडला जाऊ शकतो. शिवसेनेनं त्यावेळी समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध केला. आता मात्र ते बाजूने आहेत याचे समाधान आहे. अशीही टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हेही वाचा..मोदी सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, शरद पवारांचा सल्ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 21 व्या शतकात भारत जी प्रगती करत आहे ते संविधानामुळेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा संविधान महत्त्वाचे आहे. त्याचा सर्वांनी विचार करायला हवा. जात पंचायती विरोधात कायदा केलेले महाराष्ट्र हे राज्य आहे. समाजात चुकीच्या प्रवृत्ती असतात. त्या बाजूला ठेवल्या पाहिजेत. अश्या प्रवृत्तींन बाजूला ठेवण्याचे काम सगळ्यांनी करायला हवं, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. कोरोनाच्या संकटात गर्दी करू नका, असं शासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. त्याला आंबेडकर अनुयायांनी चांगला प्रतिसाद दिला याचा आनंद असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल, शनिवारी अमरावती आणि औरंगाबाद या दोन शहरांचा दौरा केला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतला. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः कार चालवत समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे होते. ऐरवी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सध्या एकमेकांवर टीकेची तोफ डागण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. परंतु उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा घेऊन कामाबाबत समाधान व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या ड्रीम प्रोजेक्टचं कौतुक केलं आहे, असंच म्हणावं लागेल. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट ठरलेल्या समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्र्यांनी विश्वास टाकला का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हेही वाचा...शरद पवार, अजितदादा पोहोचले संजय राऊत यांच्या घरी, भेटीचा VIDEO शिवसेनेचा समृद्धी महामार्गाला होता विरोध देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाचा मुद्दा चांगलाच तापला होता. शिवसेनेनं या महामार्गाला एकदा नाही अनेकदा विरोध केला होता. मात्र, हा विरोध झुगारून फडणवीस सरकारनं महामार्गाचं काम सुरूच ठेवलं होतं. त्यानंतर शिवसेनंनं समृद्धी महामार्गाला 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' असं नामकरण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकणाला जोणारऱ्या नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे नामकरण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं करण्यात आलं.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Maharashtra, Shiv sena, Udhav thackarey

पुढील बातम्या