अखेर अतुल भातखळकर यांनी मागितली माफी!

अखेर अतुल भातखळकर यांनी मागितली माफी!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी स्मारकावर विधानसभेत चर्चा सुरु असतांना वादग्रस्त विधान केल्याबद्दल भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांना अखेर माफी मागावी लागली.

  • Share this:

नागपूर, ता. 17 जुलै : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी स्मारकावर विधानसभेत चर्चा सुरु असतांना भाजपचे आमदार अतुल भातखळकर 'भलत्याच  विषयावर' असा शब्दप्रयोग केल्याने त्यांना अखेर माफी मागावी लागली. विरोधकांसह शिवसेनेही आक्रमक भूमीका घेत भातखळकर यांच्या निलंबनाची मागणी केली होती. दरम्यान, गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज काही काळ तहकुब देखील झाले होते.

VIDEO : 'जय श्रीराम'च्या घोषणा देत स्वामी अग्निवेश यांना बेदम मारहाण

एसीबीची सगळ्यात मोठी कारवाई, भारतीय बटालियन कार्यालयात लाच घेताना 6 जणांना अटक

मुंबईच्या समुद्रात उभारण्यात येत असलेल्या छत्रपतींच्या सागरी स्मारकाची उंची 7 फूटाने कमी करण्यात आली असल्याचा मुद्दा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडताच, अतुल भातखळकर यांनी 'भलत्याच  विषयावर' असा शब्दप्रयोग करीत तुम्ही 15 वर्षात काय केलं असा? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी सभागृहात एकच गोंधळ उडाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाची ऊंची अजिबात कमी करण्यात आलेली नाही असा दावाही केला. त्यानंतर विरोधांना काही करता आले नाही म्हणून त्यांच्या पोट दुखतंय असे विधान भातखळकर यांनी केले. भातखळकर यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानावह विरोधकांनी आक्रमक भूमीका घेत भातखळकर यांच्या निलंबनाची मागणी केली.

शिवस्मारकाच्या उंचीवरून विरोधक आमने-सामने, अब्दुल सत्तार यांनी पळवला राजदंड

VIDEO : संभाजी भिडेंचा आंबेडकरांबद्दलचा दावा हरी नरकेंनी 

समुद्रात होणाऱ्या पुतळ्याच्या उंची वरून विधानसभेत भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आले. पृथ्वीराज चव्हाण यांना अपशब्द बोलण्याच्या मुदद्यावरुन कॉंग्रेस आमदार आक्रमक झाले आणि त्यानंर घोशनबाजी सुरु असतांनाच अब्दुल सत्तर यांनी राजदंड पळवला. 10 मिनिटानंतर परत सभागृहाचे कामकाज सुरु होताच, शिवसेनेच्या आमदारांनीही भातखळकर यांनी माफी मागावी अशी भूमीका घेतली. यावेळी भाजपचे आमदार योगेश सागर आणि सेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यात जोरदार जुंपली. भातखळकर यांनी माफी मागावी यासाठी विरोधकांनीही अध्यक्षांच्या दालनासमोर ठिय्या दिला. शेवटी सेनेचे नेते सुनील प्रभू यांच्या मागणीनंतर अतुल भातखळकर यांनी सदनाची माफी मागितली.

विधानभवनाच्या खडाजंगीनंतर जानकरांकडून आंदोलकांना चर्चेचं आवाहन

VIDEO: ...जेव्हा नागपूरात माथेफिरू चाकू घेऊन पर्यटकांच्या मागे पळतो

First published: July 17, 2018, 5:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading