Home /News /maharashtra /

विद्यार्थ्यांना घरूनच देता येईल परीक्षा, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

विद्यार्थ्यांना घरूनच देता येईल परीक्षा, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

    मुंबई, 4 सप्टेंबर: राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहे. लवकरच विद्यापीठ परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देता येणार आहे. परीक्षा ऑनलाईन तसेच ऑफलाईन असेल, ती 50 गुणांचीच आणि 1 तासाची असेल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली. राज्यपालांच्या गुरुवारच्या बैठकीनंतर कुलगुरूंच्या समितीने आपला अहवाल उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांकडे सादर केला आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी विद्यापीठांकडे तीन पर्याय देण्यात आले आहेत. यात ओपन बूक, एमसीक्यू, असाईनमेंट बेस परीक्षेचा समावेश आहे. यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य विद्यापीठांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रयोगशाळेत जाऊन प्रात्यक्षिक अर्थात प्रॅक्टीकलऐवजी विद्यार्थ्यांची व्हायवा घेतली जाणार आहे. हेही वाचा...ठाकरे सरकारला दणका; JEE आणि NEET होणारच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा 15 ते 30 सप्टेंबरपर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक घेण्यात यावे. प्रात्यक्षिके हे ऑनलाइन घेण्यात येणार आहेत. परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन (जिथे जे शक्य असेल ते) असा दोन्ही पद्धतीनं घेण्यात येणार आहे. परीक्षेचा टाईमटेबल 7 सप्टेंबरपर्यंत विद्यापीठांनी कळवावा, परीक्षा कमितकमी एक तास अथवा 50 मार्कची परीक्षा असेल. 30 ऑक्टोबरपर्यंत निकाल लागावा, असं अहवालात म्हटलं आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होतील. परीक्षेच्या तारखा विद्यापीठ त्यांच्या बोर्डात जाऊन निश्चित करणार आहेत. हेही वाचा...SBI ग्राहकांसाठी मोठी घोषणा! घरबसल्या मिळेल या 8 सुविधांचा फायदा काय म्हणाले उदय सामंत?  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 7-8 सप्टेंबरला आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन यूजीसीला परीक्षेची तारीख वाढवण्याबाबत विनंती करण्यात येणार आहे. कौन्सिल, परीक्षा बोर्ड यांनी पर्याय शासनाला कळवावा. प्रात्यक्षिक परीक्षा व व्हायवासाठी स्काइप, अन्य मीटिंग अॅप्स किंवा टेलिफोनचा वापर करावा. 31 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सगळे निकाल जाहीर करु शकतो, अशी भूमिका कुलगुरुंनी घेतली आहे. त्याबाबत यूजीसीकडे पाठपुरावा करण्यात येईल.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या