मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /बीडमध्ये भर रस्त्यावर शिवसैनिकांमध्ये तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

बीडमध्ये भर रस्त्यावर शिवसैनिकांमध्ये तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

दोन्ही शिवसैनिक रस्त्यावरच भिडले. त्यामुळे दोन्ही गटातील समर्थकांमध्ये रस्त्यावरच फ्री स्टाईल मारामारी रंगली.

दोन्ही शिवसैनिक रस्त्यावरच भिडले. त्यामुळे दोन्ही गटातील समर्थकांमध्ये रस्त्यावरच फ्री स्टाईल मारामारी रंगली.

दोन्ही शिवसैनिक रस्त्यावरच भिडले. त्यामुळे दोन्ही गटातील समर्थकांमध्ये रस्त्यावरच फ्री स्टाईल मारामारी रंगली.

बीड, 24 जून: बीडमध्ये (Beed) जिल्हा प्रमुख निवडीवरून शिवसेनेत (Shivsena) राडा पाहण्यास मिळाला. जिल्हा प्रमुख निवडीवरून नवीन शिवसेना जिल्हा प्रमुखाने (Shivsena district chief) गुंडगिरी करत भर रस्त्यात माजलगाव शिवसेना शहर प्रमुख धनंजय सोळंके यांच्या जीवघेणा हल्ला केला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख म्हणून दोन दिवसांपूर्वी अप्पासाहेब जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या स्वागतासाठी जंगी तयारी शहरात करण्यात आली होती. आज माजलगाव शहरात जाधव यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी रॅली काढण्यात आली होती. जिल्हा प्रमुखांच्या निवडीवरून वाद झाला होता.  याचा राग मनात धरून अप्पासाहेब जाधव यांनी शिवसेना शहर प्रमुख धनंजय सोळंके यांच्यावर हल्ला केला.

दोन्ही शिवसैनिक रस्त्यावरच भिडले. त्यामुळे दोन्ही गटातील समर्थकांमध्ये रस्त्यावरच फ्री स्टाईल मारामारी रंगली. काठ्या, तांबी आणि बेल्टाने एकमेकांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये धनंजय सोळंके जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देशात डेल्टा+ व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार?, तज्ज्ञांची मोठी माहिती

या रॅलीत कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात आले होते.   रॅलीत शेकडो गाड्या आणि हजारो लोक सहभागी झाले होते. माजलगाव शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. या दरम्यान, कर्तव्यावर असलेला एक पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाला आहे. या कर्मचाऱ्यावर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नियम फक्त सामान्य नागरिकांना आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसंच मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील केली जात आहे.

First published:

Tags: Beed, Beed news