मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /तोडगा काढण्यासाठी आले अन् वाद पेटला; फ्रीस्टाईल हाणामारीत 13 जणांनी फोडली एकमेकांची डोकी

तोडगा काढण्यासाठी आले अन् वाद पेटला; फ्रीस्टाईल हाणामारीत 13 जणांनी फोडली एकमेकांची डोकी

(File Photo)

(File Photo)

Crime in Akola: दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण (Fight between 2 Group) केल्यानं तब्बल 13 जण जखमी (13 Injured) झाले आहेत.

अकोला, 14 ऑगस्ट: घरगुती कारणातून होणाऱ्या भांडणावर तोडगा काढण्यासाठी आलेल्या लोकांमध्येच तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण (Fight between 2 Group) केल्यानं तब्बल 13 जण जखमी (13 Injured) झाले आहेत. यातील तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी दोन्ही गटानं एकमेकांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून घटनेचा तपास सुरू केला आहे.

अमरावती येथील माहेर असलेल्या एका तरुणीचा विवाह अकोल्याच्या धोत्रा शिंदे येथील रहिवासी असणाऱ्या एका तरुणासोबत झाला होते. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच विवाहितेचा सासरच्या मंडळींसोबत वाद सुरू झाला होता. विवाहित तरुणी आणि तिच्या सासरच्यांमध्ये अनेकदा छोटे मोठे वाद झाले आहे. सातत्यानं होणारा वाद मिटवण्यासाठी विवाहितेच्या माहेराकडील काहीजण अकोल्यातील धोत्रा शिंदे याठिकाणी आले होते.

हेही वाचा-तृणमूल नेत्याच्या पत्नीसोबत भाजप नेत्याचं गैरकृत्य; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विवाहित महिलेचं आणि सासरच्या मंडळींचं दोघांची बाजू ऐकून न्यायानिवाडा केला जाणार होता. तत्पूर्वी समजूत काढताना दोन्ही गटातील वाद वाढत गेला. यातून दोन गटांनी एकमेंकावर हल्ला केला. या फ्रिस्टाईल हाणामारीत 13 जण जखमी झाले आहेत. यातील तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अकोल्यात पाठवण्यात आलं आहे. तर अन्य जखमींवर मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा-2 कोटींच्या लाच प्रकरणातील फिर्यादीच निघाला खुनी; मित्राच्या हत्येचं उलगडलं गूढ

टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, गंभीर जखमी झालेल्या तिघांमध्ये धोत्रा शिंदे येथील 45 वर्षीय शेख तालीफ शेख कुदरत आणि 25 वर्षीय शेख मुस्ताक शेख तानीफ तर अमरावती येथील 18 वर्षीय साजीद खान मोहम्मद खान यांचा समावेश आहे. याप्रकरणी  ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा  पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Akola, Crime news