मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BMC Election 2022 : दादर पश्चिम वार्डात मागच्या वेळी शिवसेना विजयी, यावेळी सत्तेची गणितं बदलली

BMC Election 2022 : दादर पश्चिम वार्डात मागच्या वेळी शिवसेना विजयी, यावेळी सत्तेची गणितं बदलली

दादर पश्चिम (Dadar West) हा वार्ड क्रमांक 192 आहे. (Ward No. 192) यामध्ये कामगार क्रीडा केंद्र, बाबासाहेब आंबेडकर नगर आणि दादर पश्चिम या भागांचा समावेश होतो.

दादर पश्चिम (Dadar West) हा वार्ड क्रमांक 192 आहे. (Ward No. 192) यामध्ये कामगार क्रीडा केंद्र, बाबासाहेब आंबेडकर नगर आणि दादर पश्चिम या भागांचा समावेश होतो.

दादर पश्चिम (Dadar West) हा वार्ड क्रमांक 192 आहे. (Ward No. 192) यामध्ये कामगार क्रीडा केंद्र, बाबासाहेब आंबेडकर नगर आणि दादर पश्चिम या भागांचा समावेश होतो.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 24 जुलै : मुंबई महापालिका निवडणुकीचे (BMC Election 2022) बिगुल वाजले आहेत. नव्या वॉर्ड रचनेनुसार आणि वाढलेल्या वॉर्डासह मुंबई महापालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) 236 वॉर्डाचे ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण सोडत (Ward Reservation Lottery) काढण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या अगोदरच राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने सत्तापालट झाला आणि राजकीय चित्र क्षणांत पालटलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतने वार्डनिहाय विशेष आढावा घेतला आहे. जाणून घ्या, वार्ड क्रमांक 192 बाबत. दादर पश्चिम (Dadar West) हा वार्ड क्रमांक 192 आहे. (Ward No. 192) यामध्ये कामगार क्रीडा केंद्र, बाबासाहेब आंबेडकर नगर आणि दादर पश्चिम या भागांचा समावेश होतो. मागच्या वेळेस 2017मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार प्रिती पाटणकर या विजयी झाल्या होत्या. त्यांनी मनसे उमेदवार स्नेहल जाधव यांना पराभूत केले होते. पाटणकर यांना 10525 इतकी मते मिळाली होत्या. तर स्नेहल जाधव यांना 8428 मते मिळाली होते. तर भाजप उमेदवार वैभवी भाटकर या तिसऱ्या क्रमाकांवर होत्या. त्यांना 7367 इतके मते मिळाली होती. तर यासोबतच दोन अपक्ष उमेदवारासह आठ जणांनीही आपले नशीब आजमावले होते. मनसे, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि बहुजन समाजवादी पार्टी या पक्षांनी दादर पश्चिम या वार्डातून आपले नशिब आजमावले होते. हेही वाचा - BMC Election: मुंबईतील वॉर्डचे आरक्षण जाहीर; अनेक दिग्गजांना फटका, वाचा कुणाला दिलासा अन् कुणाला झटका नोटाला मिळाली होती तब्बल इतकी मते -  निवडणुकीच्या आकड्यांवर नजर टाकली असता, शिवसेना, भाजप आणि मनसेमध्ये अटीतटीचा सामना रंगला होता. विजयी शिवसेना उमेदवार प्रिती पाटणकर यांना एकूण 10525 मते, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मनसे उमेदवार उमेदवार स्नेहल जाधव यांना एकूण 8428 मते मिळाली होती. तर तिसऱ्या क्रमाकांवर असलेल्या भाजप उमेदवार वैभवी भाटकर यांना एकूण 7367 मिळाली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शीतल कदम यांना 295 मते, बसपाच्या अनिता कांबळे यांना 255 आणि काँग्रेस उमेदवार 2394 मते मिळाली होती. 2017मध्ये झालेल्या या निवडणुकीत एकूण 30221 इतके मतदान झाले होते. विशेष म्हणजे, यातील तब्बल 700 मते ही नोटाला पडली होती. नुकतेच राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपने शिंदेगटाला पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. राज्यात झालेल्या या सत्तांतरानंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्याने कोणती शिवसेना खरी असा कोणती नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक 192 मध्ये गणित बदलली असल्याने काय होते ते पाहणे महत्त्वाचे आहे.
First published:

Tags: BMC, Election, Mumbai

पुढील बातम्या