लग्नाच्या हळदीत नाचताना भांडण, वाद सोडवायला गेलेल्या तरुणाला संपवलं

लग्नाच्या हळदीत नाचताना भांडण, वाद सोडवायला गेलेल्या तरुणाला संपवलं

रोहित वाघ असं मयत तरुणाचं नाव आहे. लग्नाच्या हळदीमध्ये दोन गटांमध्ये भांडण झाली. ही भांडण सोडवण्यासाठी रोहित मधे पडला.

  • Share this:

नाशिक, 28 जानेवारी : नाशिकमध्ये हळदीच्या कार्यक्रमात हत्येचा एक धक्कादायक प्रकार घडला. लग्नाच्या कार्यक्रमात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या माजी नगरसेवक सुनिल वाघ यांच्या पुतण्याचा नाशिक रोड येथील कॅनल रोड लगत असलेल्या झोपडपट्टीजवळ रात्री खून झाल्याची घटना घडली आहे.

रोहित वाघ असं मयत तरुणाचं नाव आहे. लग्नाच्या हळदीमध्ये दोन गटांमध्ये भांडण झाली. ही भांडण सोडवण्यासाठी रोहित मधे पडला. पण यात त्याचीच हत्या करण्यात आली. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

धक्कादायक म्हणजे हा सगळा प्रकार उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेलरोड परिसरात  घडला. या संपूर्ण प्रकरणात रोहितचा नाहक बळी गेला. या दुर्दैवी घटनेचा पोलीस आता कसून तपास करत आहेत.

धारधार शस्त्राने वारत करत रोहितला गंभीर जखमी करण्यात आलं. शरीरावर अनेक जखमा झाल्यामुळे रोहितचा यात मृत्यू झाला. घटना घडताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

नाशिक पोलिसांनी घटनास्थळावरून रोहितचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान, पोलीस आता प्रत्यक्षदर्शींकडून घटनेची चौकशी करत आहेत.

या प्रकरणात अद्याप कोणत्याही हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलेलं नाही. पोलीस परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपल्या मुलाचा असा नाहक बळी गेल्यामुळे वाघ कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Special Report: पालघरमध्ये भाजप श्रीनिवास वनगा यांच्या संपर्कात?

First published: January 28, 2019, 11:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading