मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nanded CCTV: जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण समिती अध्यक्ष आणि माजी उपसरपंच यांच्यात हाणामारी, घटनेचा LIVE VIDEO आला समोर

Nanded CCTV: जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण समिती अध्यक्ष आणि माजी उपसरपंच यांच्यात हाणामारी, घटनेचा LIVE VIDEO आला समोर

जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापकांसमोर मारामारी, फ्री स्टाईल हाणामारीचा VIDEO VIRAL

जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापकांसमोर मारामारी, फ्री स्टाईल हाणामारीचा VIDEO VIRAL

Free style fight in Nanded ZP school video goes viral: नांदेडमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत चक्क फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

नांदेड, 23 मार्च : जिल्हा परिषदेच्या शाळेत फ्री स्टाईल हाणामारी (free style fight in Zilla Parishad School) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील मालेगाव जिल्हा परिषद शाळेत (Malegaon ZP School in Nanded) माजी उपसरपंच आणि शालेय शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये फ्री स्टाईल मारामारी झाली. मुख्याध्यापकांच्या दालनात हा राडा झाला आहे. हाणामारीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. (Free style fight in ZP School in Nanded, incident caught in CCTV) माजी उपसरपंच सिद्धार्थ वाघमारे हे निर्गम उतारा घेण्यासाठी शाळेत आले होते. यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष परमेश्वर इंगोले हे देखील मुख्यध्यापकांच्या दालनात उपस्थित होते. वाघमारे आणि इंगोले यांच्यात यावेळी शाब्दिक वाद झाला. नंतर दोघेही आपसात भिडले. मुख्यध्यापकांच्या समक्षच या दोघांमध्ये मारामारी झाली. सध्या मालेगावात या हाणामारीची चर्चा आहे. ही संपूर्ण घटना जिल्हा परिषदेच्या शाळेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. वाचा : सरपंच होण्यासाठी आधी झाला चोर; मुख्यमंत्र्यासह बिल्डरांच्या घरात काम केलं अन्... नाशिकमध्ये पोलीस ठाण्याबाहेर दोन गटात तुफान राडा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी समोर आली होती. किरकोळ कारणातून सुरू झालेला हा वाद विकोपाला गेला आहे. दोन्ही गटांनी नांदगाव पोलीस ठाण्याच्या बाहेरच एकमेकांवर दगडाने हल्ला केला. यामध्ये हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. हा धक्कादायक प्रकार नांदगाव पोलीस ठाण्याबाहेरच घडला आहे. पोलीस ठाण्याबाहेर हाणामारी आरडाओरडा ऐकून पोलीसही बाहेर आले होते. पण पोलिसांसमोरच दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला केला. अखेर पोलिसांनी बाळाचा वापर करून दोन्ही गटांना पांगवलं. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या तुंबळ हाणामारीत दोन महिला जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन्ही गटांनी नांदगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या असून पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या हाणामारीचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Cctv, Crime, Nanded

पुढील बातम्या