Home /News /maharashtra /

छेड काढायला गेला अन् मिळाला चपलांचा प्रसाद; जळगावात रोड रोडरोमिओला धू-धू धुतला, VIDEO व्हायरल

छेड काढायला गेला अन् मिळाला चपलांचा प्रसाद; जळगावात रोड रोडरोमिओला धू-धू धुतला, VIDEO व्हायरल

Crime in Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात काही विद्यार्थिनींनी एका रोड रोमिओला चांगलीच अद्दल घडवली आहे. रोजच्या छेडछाडीला कंटाळून पीडित विद्यार्थिनींनी आरोपीला धू धू धुतलं (Female student beat road romeo) आहे.

बोदवड, 15 मार्च: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात काही विद्यार्थिनींनी एका रोड रोमिओला चांगलीच अद्दल घडवली आहे. रोजच्या छेडछाडीला कंटाळून पीडित विद्यार्थिनींनी आरोपीला धू धू धुतलं (Female student beat road romeo) आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल (Viral video) होतं आहे. या व्हिडीओत काही विद्यार्थिंनी आरोपीला तरुणाला भररस्त्यात चप्पलेनं मारहाण (Beat with shoes and slippers) करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होताच अनेक नेटकऱ्यांनी मुलींच्या हिमतीचं कौतुक केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना जळगाव जिल्ह्याच्या बोदवड तालुक्यातील येवती येथील आहे. रोड रोमिओच्या रोजच्या त्रासाला कंटाळून येथील काही विद्यार्थिनी रणरागिनी बनल्या आहेत. त्यांनी भररस्त्यात आरोपीला बेदम चोप दिला आहे. यावेळी आरोपी हात जोडून तरुणींची माफी मागताना दिसत आहे. यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याचं देखील दिसत आहे. यावेळी गर्दीतील काही लोकांनी देखील आरोपीला मारहाण केली आहे. हेही वाचा-हुक्का पार्टीत अश्लीलतेचा नंगानाच, 18 वेश्यांसोबत भलत्याच अवस्थेत आढळले 52 तरुण खरंतर, मागील काही दिवसांपासून राज्यात एसटी बसेस बंद आहेत. अशात कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आले आहे. पण एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पायपीट करत शाळा-महाविद्यालयात जावं लागत आहे. येवती येथील काही विद्यार्थिनी देखील पायपीट करत शाळा महाविद्यालयात जावं लागत आहे. त्यांना जवळपास दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. हेही वाचा-विवाहित तरुणाचा अल्पवयीन मुलीवर वारंवार रेप; कोर्टानं घडवली आयुष्यभराची अद्दल दरम्यान, एक तरुण मागील काही दिवसांपासून या विद्यार्थिनींचा पाठलाग करत होता. समज देऊनही आरोपी त्यांचा पाठलाग करायचं थांबवत नव्हता. अखेर संबंधित मुलींनीच आरोपीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संबंधित रोड रोमिओला चांगलाच चोप दिला आहे. यावेळी घटनास्थळी जमलेल्या काही नागरिकांनी देखील आपला हात रिकामा करून घेतला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Crime news, Jalgaon

पुढील बातम्या