मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Like काका, Like मुलगा, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य जेव्हा महिला पोलीस करते

Like काका, Like मुलगा, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य जेव्हा महिला पोलीस करते

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक (Trupti Mulik) या महाराष्ट्र पोलीस दलातील महिला चालकाने केले.

सिंधुदुर्ग, 26 डिसेंबर : महिलांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी घेतलेले निर्णय इतिहास कधीच विसरु शकत नाही. शरद पवारांनी महिलांना पोलीस दलात (Maharashtra Police) भरती करण्याता निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण, शहरी भागातील सुशिक्षित तरुणी आज पोलीस खात्यात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे शरद पवार 1991 साली केंद्रीय संरक्षण मंत्री असताना त्यांनी महिलांना तीनही सैन्यदलात भरती करण्याचा निर्णय घेतला होता. पवारांनी महिलांच्या आरक्षणापासून ते असे अनेक वेगवेगळे निर्णय घेतले ज्यातून त्यांनी महाराष्ट्र आणि देशातील महिलांच्या स्वप्नांना भरारी घेण्यासाठी बळ दिलं. त्यांच्या याच स्वभावाचं दर्शन आज त्यांचे पुतणे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात बघायला मिळालं. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हटल्यावर पोलिसांचा भलामोठा ताफा, तितकीच कडक सुरक्षा. हे सर्व असताना आज सिंधुदुर्गात एक वेगळी गोष्ट बघायला मिळाली. अजित पवार ज्या गाडीने प्रवास करत होते त्या गाडीचं सारथ्य थेट महिला पोलीस तृप्ती मुळीक करत होत्या. उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारर्थ्य एक कर्तबगार महिला पोलीस करत असल्याचं बघून अनेकांना या गोष्टीचं अप्रूप वाटतंय. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान अजित पवार यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या महाराष्ट्र पोलीस दलातील महिला चालकाने केले. महिलांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करून त्यांच्या सक्षमीकरणाचा लोकनेते शरद पवार यांचा वारसा उपमुख्यमंत्री अजित पवार हे समर्थपणे पुढे नेत असल्याचे यातून दिसून येत असल्याची चर्चा सध्या सिंधुदुर्गात सुरु आहे. हेही वाचा : मृत्यूच्या दाढेतून वाचवलं तीच जग सोडून गेली', आईच्या मृत्यूमुळे शोएब इमोशनल! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनाचे सारथ्य करणाऱ्या भगिनीला सलाम, अशी प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांनी दिली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या महिलांविषयी केलेल्या कामांविषयी सांगायचं झालं तर अनेक गोष्टी आहेत. त्यामधील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1993 मध्ये त्यांनी कॅबिनेटमध्ये महिला व बालविकास विभास असा स्वतंत्र प्रशासकीय विभाग म्हणून स्थापन केला होता. विशेष म्हणजे आज याच विभागातून महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या