ऐतिहासिक निकाल, स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी डॉ.मुंडे दाम्पत्याला 10 वर्षांची सक्तमजुरी

ऐतिहासिक निकाल, स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी डॉ.मुंडे दाम्पत्याला 10 वर्षांची सक्तमजुरी

  • Share this:

सुरेश जाधव, प्रतिनिधी. बीड, 09 फेब्रुवारी : बहूचर्चित गाजलेल्या परळी येथील अवैध गर्भपात प्रकरणात आज बीड जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणात न्यायालयाने डॉ. सुदाम मुंडे आणि डॉ. सरस्वती मुंडे आणि पीडितेचा पती महादेव पटेकरला दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने डॉ. मुंडे दाम्पत्याने स्त्री भ्रूण हत्येचा कारखानाच उघडला होता, असं मत नोंदवत सर्व दोषींना १० वर्ष सक्तमजुरी आणि 50हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणात 17आरोपी होते. त्यापैकी 4 मयत झाले तर 3 जणांना शिक्षा तर 14 जनाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण 

मुंडे याच्या रुग्णालयात २०१२ साली एका महिलेची गर्भलिंगनिदान चाचणी करण्यात आली असता पोटातील बाळ मुलगी असल्याची स्पष्ट झाले होते. त्यावेळी डॉक्टरने कुठलाही रेकॉर्ड न ठेवता सरळ गर्भपात केला आणि त्यातच त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण खूप तापले आणि पोलिसांनी परळी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवध तसंच अवैध गर्भलिंगनिदान चाचणी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास केला असता डॉ. मुंडे याने याआधीही अनेक गर्भपात करून ती अर्भके प्लास्टिकच्या पिशवीत भरून स्वत:च्या शेतातील पडक्या विहिरीत टाकल्याचे समोर आले होते.

प्रकरणाचा घटनाक्रम

धारूर तालुक्यातील भूपाचा येथील रहिवाशी विजय माला महादेव पट्टेकर या महिलेला चार मुली होत्या. पाचव्यांदा गर्भवती असताना 17 मे 2012 रोजी डॉ मुंडेच्या परळी येथील मुंडे हॉस्पिटलमध्ये घेवून गेला. त्यानंतर जळगाव येथील डॉ. राहुल कोल्हे यांच्या रुग्णालयात गर्भलिंग निदान करण्यात आले. पाचवे अपत्य मुलगी असायचे निष्पन्न झाले म्हणून 18 मे 2012 रोजी परळी येथील मुंडे दांपत्याच्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्यात आला. त्यावेळी विजयमालाचा अतिरक्तश्राव झाल्याने मृत्यू झाला यांची माहिती परळी पोलिसांत डॉ सुदाम मुंडे याने दिली. तसंच आपल्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात करताना वेळी मरण पावल्याची लेखी स्वरूपात माहितीही दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनांनास्थळी जावून तपासणी केली. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी देखील मुंडे रुग्णालयांची पाहणी केली. ज्या रुग्णालयाला 10 खाटांची परवानगी असताना डॉ सुदाम मुंडे याने हॉस्पिटलमध्ये 60रूम आणि 114 खाटाची निर्मिती केली होती. या घटनेनंतर pcndt कायद्याचं अंतर्गत डॉ सुदाम मुंडे आणि डॉ सरस्वती मुंडे मयत महिलेचा पती महादेव पट्टेकरच्या विरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास पोलीस उप विभागीय अधिकारी स्वाती भोर यांनी केला. मात्र, या प्रकरणात 304 अ या गुन्ह्यात जामीन मिळाला. मात्र, पुन्हा 304/13/14/15/18 कलम लागल्याने मुंडे दांपत्य फरार झाले. फरार मुंडे दाम्पत्य परळी, पुणे, पिंपरीचिंचवड, पंढरपूर, रायगड, उल्हासनगर, कानपूर, उदयपूर, जयपूर, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्रप्रदेश भागात तोंड लपवून फिरत होते. त्यानंतर काही दिवसांनी स्वत: हुन मुंडे दाम्पत्य पोलिसांना शरण आले होते.

जामीन आणि कारवाई टाळण्यासाठी मुंडे दाम्पत्यांनी कायद्याचा पळवाटा शोधून प्रयत्न केले. सप्टेंबर 2012 मध्ये अंबाजोगाई कोर्टाने 3 लाखांच्या जातमुचलक्यावर मुंडे दाम्पत्याला जामीन मंजूर केला होता. पण, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने मुंडे दाम्पत्यांचा प्रॅक्टिस करण्याचा परवान 5 वर्षासाठी रद्द केला होता. अखेर सात वर्षांनंतर स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी मुंडे दाम्पत्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाची सरकार पक्षाची बाजू अॅड मिलिंद वघीरकर यांनी प्रभावी पणे मांडली. यामुळे या प्रकरणात आरोपींना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आणि प्रत्येकी 50हजार दंड ठोठावण्यात आला.

================

First published: February 8, 2019, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading