Home /News /maharashtra /

पंकजा मुंडेंच्या परळीत रोडरोमिओच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीनं संपवलं जीवन

पंकजा मुंडेंच्या परळीत रोडरोमिओच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीनं संपवलं जीवन

रोडरोमिओवर विनयभंग करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

बीड, 20 नोव्हेंबर: सततच्या छेडछाडीला (Harassment) कंटाळून 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीनं (Minor Girl Suicide) गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना परळी (Parli Beed) शहरातील सावतामाळी नगरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओवर विनयभंग करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजली केशव नागरगोजे असं मृत अल्पवयीन मुलीचं नाव आहे. हेही वाचा.......तोपर्यंत जगातले 4 अब्ज लोक स्थूल होणार, धक्कादायक अहवाल समोर अंजलीच्या घराजवळ राहणारा मंगेश भास्करराव कोपनबैने (वय-29) हा तरुण तिची मागील वर्षभरापासून छेड काढत होता. मंगेश नेहमी तिचा पाठलाग करून बोलण्यासाठी आग्रह धरत होता. मोबाईल नंबर मागून तिची छेड काढत होता. हा सततच्या त्रास असह्य झाल्याने अंजलीने अखेर बुधवारी (19 नोव्हेंबर) सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवले, अशी माहिती अंजलीचे वडील केशव रंगनाथ नागरगोजे यांनी दिलेल्या तक्रारीत दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी मंगेश भास्करराव कोपनबैने याच्यावर संभाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कलम 306, 354 (ड) यासह पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात असून त्याला अटक करण्यात आली आहे. 'मी मरतेय, माझा शोध घेऊ नका' सायलीचे शेवटचे शब्द दुर्दैवाने ठरले खरे .. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलीचा मृतदेह एक विहिरीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या गोविंदवाडी शिवारात ही घटना उघडकीस आली. शहरातील गणेश नगर भागात राहणाऱ्या सायली कल्याण पारेकर (वय 16) असं मृत मुलीचं नाव आहे. सायली ही 16 नोव्हेंबरला पहाटे घरातून निघून गेली होती. घरातून बाहेर पडताना सायलीने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. "मी मरतीय, माझा शोध घेऊ नका व कोणालाच जबाबदार धरू नका" अशी नोट लिहून ठेवली होती. सायलीची सुसाईड नोट आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तिच्या आई-वडिलांनी पोलिसांमध्ये धाव घेऊन सायली बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध घेतला होता. पण, कुठेही तिचा मृतदेह आढळून आला नाही. अखेर गोविंदवाडी शिवारात विहिरीत एका मुलीचा मृतदेह स्थानिकांना आढळून आला. हेही वाचा...सुशांतसिंगच्या आत्महत्येचं भांडवल करुन YouTuberनं कमावले चक्क 15 लाख रुपये स्थानिकांनी पोलिसांना तातडीने घटनेची माहिती दिली. हा मृतदेह सायलीचा असल्याचे समोर आले. सायलीचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकचं खळबळ उडाली आहे. सायलीने आत्महत्या केली की घातपात? असा सवाल उपस्थितीत झाला आहे. सायलीने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास गेवराई पोलीस करत आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Beed, Maharashtra, Marathwada, Suicide

पुढील बातम्या