Home /News /maharashtra /

Thackeray Government : ठाकरे सरकार पडण्याच्या भीतीने मंत्र्यांची घालमेल वाढली, फाईली क्लिअर करण्यासाठी मंत्रालय फूल्ल

Thackeray Government : ठाकरे सरकार पडण्याच्या भीतीने मंत्र्यांची घालमेल वाढली, फाईली क्लिअर करण्यासाठी मंत्रालय फूल्ल

एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार (Thackeray government) धोक्यात आल्याचे जवळजवळ चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.

  मुंबई, 23 जून : शिवसेनेत (shiv sena) पडलेल्या फुटीमुळे राज्यातील अनेक घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार (Thackeray government) धोक्यात आल्याचे जवळजवळ चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. दरम्यान इतरवेळी मंत्रालयात फाईलींवर सह्या होण्यासाठी कित्येक दिवस लागायचे परंतु सत्तांतर होणार का या भीतीने मंत्रालयात मात्र फाईलींच्या कामांना वेग आला आहे. मंत्रालयातील कामांच्या मंजुरीसाठी टेबलांवर ढिगात फाईल्स पडून असल्याचे दिसून  येत आहे. (mantralay) तसेच यामुळे प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढल्याचे दिसून येत आहे.

  शिवसेनेतील पडलेल्या फुटीमुळे महाविकास आघाडीतील मंत्रीही चिंताक्रांत झाले आहेत. त्यामुळे फाईल क्लिअर करण्याच्या कामाला वेग आला आहे. तसेच मंत्री कार्यालयांतही धावपळ वाढली आहे. त्याचवेळी मंत्री कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही पुन्हा मूळ विभागात जावे लागू शकते म्हणून चिंता वाढली आहे. तसेच काही विभागात तर कर्मचारी कित्येक तास जादा बसत फाईल्स क्लेअर करण्याचे काम करत आहेत. दरम्यान काल (दि.23) दिवसभरात मंत्रालयातील अनेक विभागांमध्ये मोठी गर्दी होती. सध्या गृहनिर्माण विभाग सोडून काही ठिकाणी गर्दी असल्याचे दिसून आल्याचे सुत्रांनी सांगितले.

  हे ही वाचा : आता देवेंद्र फडणीवस नॉट रिचेबल! महाराष्ट्रातली राजकीय उलथापालथ शेवटच्या टप्प्यात

  भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षांमध्ये आपली मोट एकसंध बांधून ठेवली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडाने आघाडीचे जहाजात पाणी शिरले आहे. त्यामुळे सरकार केव्हाही कोसळण्याची शक्यता असल्याने मंत्री धास्तावले आहेत. विशेषतः, शिवसेनेत सुरू असलेल्या संघर्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेणे भाग पडले आहे. परंतु, मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या फाईल क्लिअर करण्याचा सपाटा लावला आहे.

  सध्या 30 जूनपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बदल्यांना स्थगिती दिली आहे. परंतु, सरकार पडले तर आपल्या बदलीचे काय होणार? याची चिंता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागली आहे. परंतु, स्थगिती आदेश उठत नाही तोपर्यंत या फाईल क्लिअर होणार नाहीत. परंतु, मंत्री कार्यालयांत वर्दळ वाढली आहे. अन्य महत्त्वाची कामे उरकून घेण्यासाठी अभ्यागतांचीही रीघ लागली आहे.

  हे ही वाचा : मुख्यमंत्री मंत्रालयाला देणार निरोप? दुपारी सर्व सचिवांसोबत उद्धव ठाकरेंची बैठक

  देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय?

  महाराष्ट्रातल्या सत्ता नाट्याचा थरार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मीडियासाठी नॉट रिचेबल असल्याचं वृत्त आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस शेवटचा धक्का द्यायच्या तयारीत आहेत का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

  भाजपकडून शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय 12 मंत्रिपदांची ऑफरही त्यांच्या गटाला आहे. त्यामुळे सध्या सहा मंत्रिपदं असलेल्या शिंदे गटाल एकूण मंत्रिमंडळाच्या 25 टक्के हिस्सा देण्याची ऑफर भाजपकडून असल्याचं बोललं जात आहे.

  42 शिवसेना आमदार आणि ८ अपक्ष असे एकूण 50 जण शिंदे गटात सहभागी होणार असल्याचं समोर येत आहे. संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या या शिवसेना गटाचं पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Shiv sena, Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या