Home /News /maharashtra /

कोरोना लशीचा मोह तुम्हाला आणू शकतो संकटात, महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार समोर

कोरोना लशीचा मोह तुम्हाला आणू शकतो संकटात, महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार समोर

मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगार देशात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत.

अमरावती, 29 डिसेंबर : कोरोना व्हायरस या संकटामुळे संपूर्ण जगाला हादरा बसला. त्यामुळे या संकटातून बाहेर पडण्यासाठी जगभरातील सगळेजणच उत्सुक आहेत. कोरोना लशीची बातमी येताच ही लस आपल्यालाही मिळावी, यासाठी नागरिकांकडून प्रयत्न केला जात आहे. मात्र हाच प्रयत्न तुम्हाला गुन्हेगारांच्या सापळ्यातही अडकवू शकतो. मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगार देशात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर करून सामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याचा बर्‍याच घटना उघडकीस आल्या आहेत. अशातच तोतयाकडून आता covid-19 च्या काळात लस येण्यापूर्वी नोंदणीचे कारण पुढे करून नागरिकांकडून गोपनीय माहिती ओटीपी, ईमेल आयडी,आधार कार्ड,अशा डिटेल्स नागरिकांकडून मागितल्या जात असल्याची बाब अमरावती शहर पोलिसांना निदर्शनास आली आहे. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणूक: सरकारचा मोठा निर्णय, जात पडताळणी अर्जासाठी मुदतवाढ शासनाकडून ऑनलाईन लस मिळण्याकरिता फोन कॉलच्या माध्यमातून आधार कार्ड ओटीपी अथवा ईमेल आयडी यांची मागणी करण्यात येत नाही. त्यामुळे कोणीही अनोळखी व्यक्ती अशी माहिती मागत असेल तर अशा नागरिकांना आपली गोपनीय माहिती देऊ नका, असं आवाहन पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी केलं आहे. दरम्यान, आधार कार्डच्या नावाखाली ओटीपी शेअर झाल्यास आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामधून पैसे काढून फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकानेच सतर्क राहावं, असं आरती सिंग यांनी म्हटलं आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Amravati, Coronavirus, Cyber crime

पुढील बातम्या