गतिमंद तरुणाने स्ट्रेचरवर जाऊन केलं मतदान, पार पाडलं राष्ट्रीय कर्तव्य

गतिमंद तरुणाने स्ट्रेचरवर जाऊन केलं मतदान, पार पाडलं राष्ट्रीय कर्तव्य

नंदुरबार जिल्यातील शहाद्यात पार्थ सोनार या 26 वर्षीय गतिमंद तरुणाने स्ट्रेचरवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.

  • Share this:

निलेश पवार (प्रतिनिधी)

नंदुरबार, 26 एप्रिल- नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार के.सी.पाडवी आणि भाजपच्या विद्यमान खासदार हीना गावित यांच्यात प्रमुख लढत होत आहे. आज उत्साहात मतदानाला प्रारंभ झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्यात पार्थ सोनार या 26 वर्षीय गतिमंद तरुणाने स्ट्रेचरवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं. पार्थ याने सोनार गल्लीमध्ये असलेल्या लडकोरबाई शाळेत जाऊन मतदान केलं. पार्थ हा 'सेलब्रेल पारसी' आजाराने ग्रस्त आहे. त्याने या अवस्थेत मतदानाचा हक्क बजावला. पार्थ याने आतापर्यंत 4 वेळा मतदान केलं आहे.

काँग्रेस उमेदवार के.सी.पाडवी यांनी असली येथे कुटुंब समवेत मतदान केले. नंदुरबार मधल्या नॅशनल हायस्कुलमध्ये मुस्लिम महिला मतदार रांग लागली आहे.

नवापूरमध्ये मशीन बदलल्या..

नवापूरमध्ये 2 मतदान केंद्रावर मशीन बाबत तक्रारी आल्यानंतर मशीन बदलण्यात आल्या. त्यामुळे मतदान क्रमांक 184 व 309 येथे उशिराने मतदानाला सुरवात झाली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. एकूण 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये नागरिक आपले बहुमुल्य मत नोंदवणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 17 जागा, उत्तर प्रदेश-राजस्थानातील प्रत्येकी 13-13 जागा, पश्चिम बंगालमधील 8 जागा, मध्य प्रदेश-ओडिशातील 6-6 जागा, बिहारमधील 5 जागा, झारखंडतील 3 जागा आणि जम्मू काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील 15 विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे, पूनम महाजन, गजानन कीर्तिकर, गोपाळ शेट्टी, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, कपिल पाटील, श्रीकांत शिंदे, राजेंद्र गावित, सदाशिव लोखंडे, राजन विचारे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव-पाटील, हिना गावित आणि हेमंत गोडसे यांची आज परीक्षा आहे.

तर दुसरीकडे, गजेंद्र सिंह शेखावत, गिरिराज सिंह, कन्हैय्या कुमार, अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव, उपेंद्र कुशवाहा, वैभव गहलोत आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांचंही भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

VIDEO: प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांनी बजावला मतदानाचा हक्क

First published: April 29, 2019, 1:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading