मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वडिलांचं अफेअर मुलांना नाही पटलं, महिलेचा असा केला खून केली बारामती पोलिसही झाले हैराण

वडिलांचं अफेअर मुलांना नाही पटलं, महिलेचा असा केला खून केली बारामती पोलिसही झाले हैराण

 धक्कादायक म्हणजे,  महिलेला ह्रदयविकाराचा झटका आल्याचे दाखवून रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

धक्कादायक म्हणजे, महिलेला ह्रदयविकाराचा झटका आल्याचे दाखवून रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

धक्कादायक म्हणजे, महिलेला ह्रदयविकाराचा झटका आल्याचे दाखवून रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

बारामती, 23 नोव्हेंबर : वडिलांबरोबर संबंध ( affair) ठेवणाऱ्या महिलेचा मुलाने व मुलीनेच खून (murder) केल्याची घटना बारामतीमध्ये (baramti) उघड झाली आहे. धक्कादायक म्हणजे,  महिलेला ह्रदयविकाराचा झटका आल्याचे दाखवून रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. शहर पोलिसांनी मुलाला व मुलीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती कसबा परिसरामध्ये 11 नोव्हेंबर रोजी रात्री एका महिलेचा मृत्यू हार्टअटॅकमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. पण सदर हार्टअटॅक नसून घातपात आहे, याबाबतची कुजबूज त्या परिसरामध्ये सुरू होती. सदरची कुजबूज काही दिवसानंतर पोलिसांच्या कानावर आली.

या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी त्यांची गोपनीय यंत्रणा कामाला लावली. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सुद्धा सदर बाबत गोपनीय माहिती काढून वस्तुस्थिती काय आहे याबाबत आढावा घेण्यास सांगितले. सदर ठिकाणी कुणीही उघड माहिती सांगत नव्हतं, सदर घटनेबाबत कुणीही उघडपणे तक्रार देत नव्हता. त्यामुळे संशयित व्यक्तीकडे चौकशी करणे जिकरीचे झाले होते.

भारतात बूस्टर शॉट्स सुरू व्हायला हवेत का? जगात काय स्थिती? तज्ञांचं म्हणणं काय?

पोलिसांसमोर जो घटनाक्रम उभा राहिला होता. त्या घटनाक्रमामध्ये असणाऱ्या लोकांना पोलिसांनी चौकशीला बोलावले होते. त्यातून मयत स्वाती विनय आगवणे (वय 50) यांचे कसबा भागातमध्ये राहणारे प्रमोद उर्फ दादा नामदेव फडतरे (वय 63) यांच्यासोबत 10 वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते. प्रमोद हे कसबामध्ये त्यांचा मुलगा ऋषिकेश प्रमोद फडतरे (वय 34) व मुलगी (वय 33 ) सुन व पत्नी यांच्यासोबत राहत होते.

प्रमोद फडतरे यांचा कसबा भागामध्ये फडतरे वाडा म्हणून दुसरे जुने घर आहे. त्या घरामध्ये मयत स्वाती व प्रमोद फडतरे हे अधून मधून एकमेकांना भेटायचे. याची कल्पना फडतरे यांच्या कुटुंबीयांना होती. दोन्ही कुटुंबीयांना त्यांच्या या मैत्रीचा व भेटण्याचा राग होता. ती गोष्ट त्यांना आवडत नव्हती. परंतु दोघेही एकमेकांना सर्व विरोध झुगारून अधून मधून भेटत होते.  प्रमोद फडतरे यांचे मुलगा ऋषिकेश  आणि मुलीचा याला तीव्र विरोध होता. यातून त्यांचे भांडण झाले होते.

१० तारखेला प्रमोदचा वाढदिवस होता. वाढदिवस घरी बायका मुलांच्या मध्ये साजरा केल्यानंतर ते फडतरे वाड्यावर आले त्यानंतर त्यांनी मयत महिलेला बोलून घेतले. काही वेळानंतर ते दोघे फडतरे वाड्यावर आहेत. याबाबतची माहिती कुणीतरी मुलगा ऋषिकेश प्रमोद फडतरे व मुलगी अनुजा यांना सांगितले. त्यानंतर ते दोघे त्या ठिकाणी आले व त्यांनी रागाच्या भरात स्वाती आणि प्रमोदला काठीने बेदम मारहाण केली.

चिंता वाढली ! राज्यात गेल्या 20 दिवसांत हजाराहून अधिक मुलांना Corona

मारहाणीनंतर मयत महिला निपचित पडली. व प्रमोद फडतरे जखमी झाले. नंतर प्रमोद फडतरे व आरोपी ऋषिकेश व त्याची बहीण यांनी सदर महिलेस दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न केले. परंतु रात्रीची वेळ असल्याने वाहन उपलब्ध झाले नाही.  त्यानंतर सदर ऋषिकेश याने त्याचे कौटुंबिक डॉक्टर फिर्यादी सुनिल पवार यांना मोबाईलद्वारे त्यांनी मारहाण केल्याबाबत कळवले. रात्रीची वेळ असल्याने डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यास सांगितले. परंतु, आरोपी व जखमी प्रमोद यांनी वाहन उपलब्ध न झाल्याने दवाखान्यात नेले नाही. त्यानंतर डॉक्टरांनी येऊन तपासणी केली असता स्वाती यांचा मृत्यू झाला होता. त्यांना कोणतीही बाहेरून कोणतीही दुखापत झाली नव्हती, त्यामुळे ह्रदयविकाराचा झटका आल्याचा बनाव रचण्यात आला.

वडिल प्रमोद यांनीही मुलांच्या करिअरपोटी त्यांना साथ दिली. त्यानंतर रात्रीतूनच मयत स्वाती यांच्यावर अंत्यस्कार उरकण्यात आले. विशेष म्हणजे, मयताच्या नातेवाईकांनी सोपस्करपणे सर्वांच्या उपस्थितीमध्ये मयताच्या अंत्यविधी करून टाकला. पण, पोलिसांनी जेव्हा डॉक्टराची कसून चौकशी केली असता संपूर्ण प्रकार समोर आला. डॉक्टरांच्या जबाबावरून निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून आरोपी ऋषिकेश फडतरे व त्याची बहीण यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

दरम्यान, या प्रकरणामध्ये कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्यास त्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल या अटीवर त्यांनी तपासामध्ये सहकार्य करावे असे पोलिसांनी आव्हान केले आहे.

First published: