नाशिक, 08 जानेवारी : एका जन्मदात्या बापानेच आपल्या पोटच्या लेकीला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये (nashik) उघड झाली आहे. धक्कादायक म्हणजे, या नराधम बापाने आपल्यावर हत्येचा आरोप लागू होऊ नये म्हणून हत्येचा बनाव देखील रचला. पण पोलिसांनी अवघ्या 24 तासात फिर्यादीच आरोपी असल्याचं निष्पन्न नराधम बापाचे कृत्य समोर आलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम माधव धनगरे (ram dhangare) असं या नराधम बापाचे नाव आहे. या आरोपीने आपल्या मुलीच अपहरण करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे त्यानेच पोलिसांत तक्रार देऊन बनाव रचला होता.
(Sovereign Gold Bond:10 जानेवारीपासून स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी,काय आहे योजना)
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडी परिसरात निर्जनस्थळी झाडाला गळफास लागल्या अवस्थेत आढळून आली आणि नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या चिमुकलीला गळफास कोणी आणि का दिला असावा असा प्रश्न उपस्तीत होऊ लागला होता. अत्यवस्थ स्थितीत या मुलीला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आणि कुटुंबीयांना बोलावून ओळखही पटली. बापाच्या तक्रारीहुन पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हाही दाखल केला. मात्र या प्रकरणात जे सत्य समोर आलं ते धक्कादायक होतं. कारण, फिर्याद देणाऱ्या बापानेच आपल्या मुलीला फासावर लटकविण्याच कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. फिर्यादी असलेला बापच नंतर संशयित आरोपी म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर आला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
(राकेश झुनझुनवाला यांनी 'या' स्टॉकमधील गुतंवणूक घटवली; शेअरमध्ये वर्षात 113% वाढ)
अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या मुलीच्या माहिती नंतरच आरोपी कोण आहे हे समजणार होतं. मात्र मुलीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मुलीच्या खाना खुणांवरून बापावर संशय बळावला आणि त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षकांना दिली. पोलीस अधिक्षकांनी प्रकरणाच गांभीर्य लक्षात घेत स्वत: याचा तपास केला. ज्या ठिकाणी मुलीला गळफास दिला होता त्या ठिकाणी आढलेली नायलॉनच्या दोरीचा काही भाग घरात आढळून आला.
या एका आधारावर आरोपी घरातीलच आहे या निष्कर्षावर पोलीस आले आणि त्यांनी तपास सुरू केला असता फिर्याद देणार बापानेच आपल्या दुसऱ्या पतीच्या विरोधामुळे या मुलींची हत्या करण्याचा कट रचल्याच समोर आलं. या प्रकरणी संशयित आरोपी असलेला बाप पोलिसांच्या ताब्यात असून या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग होता का याचा तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.