शिर्डीत बाप-लेकानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

शिर्डीत बाप-लेकानेच  केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

याप्रकरणी काल रात्री उशिरा शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी बापाला पोलिसांनी गजाआड केलेय तर मुलगा पसार झाला आहे.

  • Share this:

25 फेब्रुवारी :  शिर्डीतील एका नराधम बापलेकाने जवळ राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  याप्रकरणी काल रात्री उशिरा शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी बापाला पोलिसांनी गजाआड केलेय तर मुलगा पसार झाला आहे.

आरोपी गजानन देशमुख आणि त्याचा मुलगा धनंजय देशमुख यांनी जवळ राहणा-या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला काहीतरी वस्तु देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले.  मग  तिच्या चहात गुंगीचं औषध मिसळून तिच्यावर अत्याचार केला . त्यानंतर तिच्यावर अत्याचार  केल्याची तक्रार पीडित मुलीनं काल रात्री उशिरा शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केलीय.  शिर्डी पोलीसांनी बलात्काराच्या गुन्ह्यासह अॅट्रोसिटी आणि बाल लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी गजानन देशमुख यास गजाआड केलं आहे. तर मुलगा धनंजय देशमुख हा पसार झाला असून त्याचा पोलीस शोध घेताहेत

दरम्यान या नराधम बापलेकाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पिडीत मुलीच्या घरच्यांनी केली आहे.  अशा प्रकारच कृत्य कोणीही करणार नाही यासाठी यांना कठोर शिक्षा करणे गरजेचं आहे

First published: February 25, 2018, 8:15 PM IST

ताज्या बातम्या