बारामती, 22 एप्रिल : बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासावी अशी लाजीरवाणी घटना बारामतीमध्ये घडली आहे. शहरात राहणाऱ्या एका नराधम बापानेच आपल्या पोटच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नराधम बापाला बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी अटक केली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 13 वर्षांची सातवीमध्ये, शिकत असताना पीडित मुलीला मासिक पाळी दरम्यान त्रास व्हायचा आणि पोटात दुखत असायचे. याचाच फायदा घेऊन नराधम बापाने आई घरात नसताना, पीडित मुलीला तुझ्या पोटात दुखतंय का? मला यावर उपाय माहिती आहे. असे सांगून वडिलांनीच मुलीवर अतिप्रसंग केला.
हेही वाचा - गोव्याने असं केलं तरी काय? ज्यामुळे ठरलं कोरोनामुक्त होणारं देशातलं पहिलं राज्य
नंतर या नराधम बापाने सन 2013 ते 19 मार्च 2020 या कालावधीत धमकी देऊन मुलीवर वेळोवेळी अतिप्रसंग केला. सदर कुटुंबातील आई आणि पीडित मुलगी धुणीभांडी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.
परंतु, नराधम बाप कसले काम न करता मुलीला आणि आईला मारहाण करीत असत. या त्रासाला कंटाळून शेवटी मंगळवारी पीडित मुलीने बारामती शहर पोलिसांना आपल्या पित्याविरोधात तक्रार दिली आहे.
हेही वाचा - रेल्वे आली धावून, 5 वर्षांच्या चिमुरड्यासाठी पुण्यातून बेळगावला पोहोचवली मदत
शहर पोलिसांनी या नराधम बापाला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून याबाबतचा तपास बारामती शहर पोलीस स्टेशनच्या एपीआय अश्विनी शेंडगे करीत आहेत.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.