Home /News /maharashtra /

बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा, नराधमाने केला वर्षभर लेकीवरच अत्याचार!

बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा, नराधमाने केला वर्षभर लेकीवरच अत्याचार!

 एका घरात स्वयंपाकी असणाऱ्या अशोक चौधरी या नराधमाने आपल्याच 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील एक वर्षांपासून जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले.

एका घरात स्वयंपाकी असणाऱ्या अशोक चौधरी या नराधमाने आपल्याच 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील एक वर्षांपासून जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले.

एका घरात स्वयंपाकी असणाऱ्या अशोक चौधरी या नराधमाने आपल्याच 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील एक वर्षांपासून जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले.

    प्रमोद पाटील, प्रतिनिधी नेरुळ, 17 मे : बाप आणि मुलीच्या (fathers and daughters) नात्याला काळीमा फासणारी घटना नेरुळमध्ये (nerul) घडली आहे. एका नराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नराधम बापाविरोधात पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आरोपी बाप हा फरार असून पोलीस शोध घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका घरात स्वयंपाकी असणाऱ्या अशोक चौधरी या नराधमाने आपल्याच 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील एक वर्षांपासून जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले. याची माहिती घरातील मालकीण असलेल्या महिलेला मिळताच मुलीलासोबत घेऊन नेरूळ पोलीस स्टेशन गाठले आणि नराधम बापाविरोधात तक्रार केली. पोलिसांनी मुलीच्या कागदपात्रांची चौकशी करून ती अल्पवयीन असल्याचे निदर्शनात आल्याने बापाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नराधम बाप फरार असल्याने त्याचा पोलीस शोध घेत आहे. काय आहे घटना? नेरूळमध्ये एका घरात मागील 20 वर्षांपासून आरोपी अशोक चौधरी हा स्वयंपाकी म्हणून कामाला होता. त्याच्यासोबत त्याने आपली मुलगी आपल्या गावातून मागील एक वर्षापूर्वी आणली होती. ती त्याच्यासोबत राहत होती. घराचे मालक आणि पत्नी तीन मुले अशी पाच जणे राहत होती. (वाचा-'आज तू जाऊन 2 वर्षे झाली..' अभिनेता हार्दिक जोशी आजही या खास मित्राला करतो मिस) सोमवारीच्या रात्री 3 वाजून 30 मिनिटांनी अचानक घरातील मालकीण महिला उठली असता आरोपीला दिलेल्या रूम मधून संशयास्पद आवाज आला असता त्यांनी जाऊन बघितले तर हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. बापाला जाब विचारलाय गेली असता काहीही न बोलता नराधम बाप घरातून पळून गेला. मंगळवारी सकाळी मुलीला घेऊन फिर्यादी घर मालकीण नेरूळ पोलीस ठाण्यात येऊन बापाविरोधात तक्रार दिली. मुलीला विचारणा केली असता तिने हा प्रकार वर्ष भरापासून चालू असल्याचे सांगतले. तसंच, कुणाला बोलल्यास मारून टाकण्याची धमकी बापाने दिली होती, असंही तिने सांगितलं. (खांबाला रुमाल बांधून खेळत होता अन् गळफास बसला, 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू) या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी मुलीचे वय यापासून बाप अशोक चौधरी विरोधात बालकांचे संरक्षण अधिनियम व नियम  2012 प्रमाणे पोक्सो अंतर्गत नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आणि बापाचा शोध नेरूळ पोलिसांनी सुरू केला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या