Home /News /maharashtra /

आपल्याच मुलीच्या 12 वर्षांच्या मैत्रिणीवर बापाने केले अत्याचार, पीडित 4 महिन्याची गरोदर!

आपल्याच मुलीच्या 12 वर्षांच्या मैत्रिणीवर बापाने केले अत्याचार, पीडित 4 महिन्याची गरोदर!

दोन दिवसांपूर्वी या मुलीचं पोट दुखत असल्यानं तिच्या आईनं डॉक्टरकडे नेलं आणि तपासात जे समोर आलं, त्यानं आई-वडिलांना धक्काच बसला

    हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 16 मार्च :  चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात आपल्या मुलीच्या 12 वर्षीय मैत्रिणीवर अत्याचार करणाऱ्या एका नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. ही पीडित मुलगी 4 महिन्याची गरोदर आहे.  दरम्यान, या पीडितेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेने चंद्रपूर आणि राज्यात खळबळ उडाली आहे. गावातीलच योगेश दोहतरे नामक आरोपीच्या घरी त्याच्या मुलीची 12 वर्षीय मैत्रीण यायची. तिच्यावर योगेशची नजर होती. ती घरी आली की, तो लगट करायचा आणि कुठं वाच्यता केली, तर जीवानिशी ठार मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळं मुलगी घाबरून सगळं सहन करायची. याचा फायदा उचलत त्यानं लैंगिक अत्याचार सुरू केले. दोन दिवसांपूर्वी या मुलीचं पोट दुखत असल्यानं तिच्या आईनं डॉक्टरकडे नेलं आणि तपासात जे समोर आलं, त्यानं आई-वडिलांना धक्काच बसला. त्यानंतर हा सगळा प्रकार तिनं कथन केला. त्यावरून शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. तक्रारीवरून आरोपी योगेश दोहतरे याच्याविरुद्ध पॉक्सो, 376 कलमाखाली गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पीडित मुलीला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यासंबंधी विविध तपासण्या करण्यात आल्या आहे. चिमूर पोलिसांचे महिला पोक्सो पथक वहानगाव इथं तळ ठोकून आहे. या घटनेचं अधिक तपशील मिळवले जात आहेत. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी -मुनगंटीवार दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही घटना धक्कादायक असल्याचे सांगत, 'ही राक्षसी प्रवृत्ती' असल्याची टीका केली आहे.  'ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून या प्रकरणांची विशेष जलदगती न्यायालयात सुनावणी करण्याची विनंती गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करणार', असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. सध्याच्या कायद्यांचा गुन्हेगारांना धाक राहिला नसून त्यामुळे हे प्रकार घडत असल्याची टीकाही मुनगंटीवार यांनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Chandrapur, Crime, News, Rape, UP

    पुढील बातम्या