बाप-लेकीच्या नात्याला कलंक, बापानेच केला 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

बाप-लेकीच्या नात्याला कलंक, बापानेच केला 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये 9 वर्षीय चिमुकलीवर सख्या बापानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

बुलडाणा, 15 सप्टेंबर : बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये 9 वर्षीय चिमुकलीवर सख्या बापानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खामगाव तालुक्यातील सुटाला खुर्द गावात हा लज्जास्पद बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे.

पीडित मुलीची आई घराघरात धुणीभांडी करते. नेहमीप्रमाणे त्या त्यांच्या कामाला गेल्या होत्या. सायंकाळ होताच पीडित मुलगी शाळेतून घरी आली. तिला आणखी दोन भाऊ आहेत. ते बाहेर खेळत होते. मुलगी घरात एकटी असल्याचं लक्षात घेत दारुड्या बापाने आपल्या सख्या मुलीवर बलात्कार केला आणि तिला मारहाण केली.

यानंतर रात्री पीडितेची आई घरी आल्यनंतर दारूच्या नशेत त्याने तिलाही जबर मारहाण केली आणि मुलांसह घराबाहेर हाकलून दिलं. रात्रभर आई, पीडिता आणि तिचे दोन भाऊ हे गावच्या मंदिराजवळ झोपले होते. सकाळ होताच पीडित मुलीची तब्येत बिघडली.

तिला तिच्या आईने काय झालं विचारलं असता हा सगळा गंभीर प्रकार समोर आला. यानंतर या प्रकरणासंबंधी पोलीस ठाण्यात वडिलांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे तर पीडित मुलीला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्या सध्या वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत.

दरम्यान, तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिल संदीप महाजनला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर आता या प्रकरणाचा पंचनामा सुरू आहे. पण या सगळ्या खळबळजनक प्रकारामुळे संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

 

VIDEO: हा पाहा लहान मुलींना पट्ट्याने निर्दयपणे मारणारा स्वीमिंग कोच

First published: September 15, 2018, 1:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading