• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • लेकीवर सगळ्यात जास्त माया करणाऱ्या बापानेच केला बलात्कार, कोल्हापुरातलं धक्कादायक प्रकरण

लेकीवर सगळ्यात जास्त माया करणाऱ्या बापानेच केला बलात्कार, कोल्हापुरातलं धक्कादायक प्रकरण

7 वर्षीय चिमुकलीवर तिच्याच वडिलांकडून बलात्कार करण्यात आला आहे. पत्नीच्या सतर्कतेमुळे हा गंभीर प्रकार उघड झाला आहे.

  • Share this:
कोल्हापूर, 11 जानेवारी : कोल्हापूरमध्ये महिला अत्याचाराचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बापानेच पोटच्या लेकीवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. अवघ्या 7 वर्षीय मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 7 वर्षीय चिमुकलीवर तिच्याच वडिलांकडून बलात्कार करण्यात आला आहे. पत्नीच्या सतर्कतेमुळे हा गंभीर प्रकार उघड झाला आहे. पत्नीकडून नराधम पतीविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपी नराधम बापाला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून वारंवार महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यात जर मायेचा हात फिरवणाऱ्या बापानेच असा प्रकार केला तर मुली घरातही सुरक्षित नाही असं म्हणावं लागेल. घरातील वडिलच जर लेकीवर असा अत्याचार करत असेल तर मुलींनी कुठे जावं हा मोठा प्रश्न आहे. या सगळ्यामुळे संतप्त नागरिकांनी नराधमाला बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. इतर बातम्या - मुलांना सांगितलं माझ्याकडे पाहू नका, तोपर्यंत आईने केला बॉयफ्रेंडसोबत SEX पोटच्या 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करत होता HIV बाधीत बाप, कोर्टाने दिली 'ही' शिक्षा दरम्यान, 10 जानेवारीला बलात्काराचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी कोर्टाने 31 वर्षीय नराधम बापाला चार वेळा जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा सुनावली आहे. धक्कादायक म्हणजे नराधम बाप HIV बाधीत आहे. कुमार असे नराधम बापाचे नाव आहे. महिला कोर्टाच्या न्यायाधीश एजहिलारसी यांनी नराधमाला चार वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नराधमाली ही शिक्षा एकाच वेळी भोगावी लागणार आहे.नराधमाचा मृत्यू होत नाही तोपर्यत तुरुंगातून त्याची सूटका न करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. इतर बातम्या - हा जल्लाद देणार निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी, आतापर्यंत 80 जणांना धाडलं यमसदनी राज्य सरकारला दिले हे निर्देश.. कोर्टाने नराधमाला आजीवन कारवासाच्या शिक्षेसह 4,500 रुपये दंड सुनावला आहे. याशिवाय पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नराधम बापाला सहा महिने कारवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच पीडितेच्या उपचारासाठी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश कोर्टाने राज्य सरकारला दिले आहे. मधुकरईमधील दिहाडी येथे मोलमजुरी करणाऱ्या कुमारने आपल्या 10 वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार केला होता. धक्कादायक म्हणजे कुमार HIV बाधित आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published: