Home /News /maharashtra /

आई-वडिल आणि भावाच्या आत्महत्येचा मुलीला मोठा धक्का, पतीसोबत मारली नदीत उडी!

आई-वडिल आणि भावाच्या आत्महत्येचा मुलीला मोठा धक्का, पतीसोबत मारली नदीत उडी!

गडचिरोलीमध्ये आई-वडिल आणि मुलाने सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

    गडचिरोली, 10 फेब्रुवारी : गडचिरोलीमध्ये आई-वडिल आणि मुलाने सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेला काही तास उलट नाही तेच मुलगी आणि जावयानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. गडचिरोली सामूहिक आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. आत्महत्या केलेल्या रवींद्र वरगंटीवार यांची मुलगी आणि जावयानेही नदीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आई, वडिल आणि भावाने आत्महत्या केल्याच्या धक्क्यातून लग्न केलेली मुलगी आणि जावई यांनी चामोर्शी लगतच्या पोर नधीत उडी मारली. माञ, त्यांच्याकडून अशा घटनेची शक्यता असल्यानं पोलीस त्याच्या मागावर होते. दोघांनी नदीत उडी मारल्यानंतर पोलिसांनी तातडीने नदीत उडी मारून दोघांनीही बाहेर काढलं. या दोघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. आज दुपारी रवींद्र वरगंटीवार त्याची पत्नी आणि मुलाने विहिरीत सामूहिक आत्महत्या केली होती. रवींद्र वरगंटीवार यांचे कुटुंबीय गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड अस्वस्थ होतं. रवींद्र नागोराव वरगंटीवार ( वडील), वैशाली रवींद्र वरगंटीवार( आई) आणि साईराम रवींद्र वरगंटीवार ( मुलगा) या तिघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या लग्नाच्या विषयावरुन अस्वस्थ असलेल्या कुटुबीयांची अनेकांनी त्यांची समजूत काढल्यानंतरही ते प्रचंड अस्वस्थ होते. याच अस्वस्थतेतून तिघांनीही सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि ते सोमवारी दुपारी बारा ते एक वाजेच्या सुमारास विवेकानंदनगर परिसरातील मोकळ्या जागेत असलेल्या विहिरीवर पोहोचले. तिथे आपल्याजवळील सामान विहिरीच्या काठावर काढून ठेवत तिघांनीही एकत्र उडी घेतली. तिघांनीही आत्महत्येपूर्वी विहिरीबाहेर मोबाईल आणि चप्पला काढून ठेवल्या होत्या. विहिरीच्या काठावर मोबाईल आढळून आल्यामुळे तिघांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली. ही माहिती शहरात पसरतात अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. आत्महत्येचं कारण स्पष्ट नसलं तरी मुलीच्या आंतरजातीय लग्नातूनच तिघांनी आत्महत्या केल्याची चर्चा शहरात आहे. या ह्रदयद्रावक घटनेनं शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Gadchiroli

    पुढील बातम्या