नाशिक, 04 जानेवारी: नाशिकमधील (Nashik) एका वडिलानं (Father) आपल्या पोटच्या मुलाची (Son) हत्या (Murder) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वडील आपल्या प्रेयसीच्या (Lover) नावावर जमीन करत होते. याला कुटुंबीयांनी विरोध केला. यातून झालेल्या वादातून पित्यानं आपल्या मुलाची गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेनं जनरल वैद्यनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
प्रभाकर माळवाड असं संबंधित आरोपीचं नाव आहे. माळवाड यांनी आपल्या 28 वर्षीय पोटच्या मुलाची गळा आवळून हत्या केली आहे. या झटापटीत मृत मुलाची आई जयश्री माळवाड यांनी विरोध केला असता तिलाही आरोपीनं मारहाण केली आहे. आरोपी प्रभाकर हा देवळा सरकारी पशुसंवर्धन दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतो. त्याचं बाहेर एका महिलेशी अनैतिक संबंध होते. यातूनच हा वाद झाला. आई जयश्री यांच्या फिर्यादीनंतर आरोपी प्रभाकर माळवाडला पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
आरोपी प्रभाकर माळवड हा देवळा सरकारी पशुसंवर्धन दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतो. गेल्या काही दिवसांपासून त्याचं एका महिलेसोबत प्रेमसंबंध जुळलं होतं. या अवैध प्रेमाच्या आहारी जावून त्यांनी संबंधित महिलेच्या नावावर जमीन करण्याचा निर्णय घेतला. याला 28 वर्षीय मुलगा निलेशनं विरोध केला. यातून हा वाद वाढत गेला आणि या वादाचं रुपांतर हत्येत झालं.
आपल्या प्रेयसीच्या नावावर जमीन करण्याचा हट्टापायी आरोपीनं आपल्या पोटच्या मुलाचा जीव घेतला आहे. यावेळी झटापटीत मृत मुलाच्या आईनं विरोध केला, तिलाही निर्दयी आरोपीनं मारहाण केली आहे. याप्रकरणी मृत मुलाच्या आईनं पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.