Home /News /maharashtra /

अपंग मुलीचं प्रेम बापाला खटकलं, खून करून मृतदेह नाल्यात फेकला

अपंग मुलीचं प्रेम बापाला खटकलं, खून करून मृतदेह नाल्यात फेकला

पोलिसांनी जेव्हा घरच्यांची चौकशी केली असता सर्वांनी उडवाउडवीची उत्तर दिली त्यामुळे पोलिसांना संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच मुलीच्या वडिलांनी खुनाची कबुली दिली.

    रवी जयस्वाल, प्रतिनिधी जालना, 27 नोव्हेंबर : खोट्या प्रतिष्ठेसाठी जन्मदात्या बापानेच साडू आणि भाच्याच्या मदतीने अपंग मुलीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात उघडकीस आली. मुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते त्यातून ती गर्भवती राहिल्यामुळे हत्या केल्याचं बापाने कबूल केलं आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा-मेहगाव इथं सोमवारी एका नाल्याच्या काठावर २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृत मुलीच्या खिश्यात पॅनकॉर्ड सापडल्यामुळे तिची ओळख पटली. छाया समाधान डुकरे असं या मृत मुलीचे नाव आहे. पॅनकॉर्डच्या आधारे पोलिसांनी तिचे घरं शोधून काढलं. पोलिसांनी जेव्हा घरच्यांची चौकशी केली असता सर्वांनी उडवाउडवीची उत्तर दिली त्यामुळे पोलिसांना संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच मुलीच्या वडिलांनी खुनाची कबुली दिली. छाया ही पुण्यात शिक्षण घेत होती. त्यासोबतच ती खाजगी नोकरीसुद्धा करायची. याच दरम्यान तिचे शुभम वराडे ( राहणार भुसावळ) याच्या सोबत प्रेमसंबंध जुळले. यातून ती गर्भवती राहिली. दिवाळीनिमित्त सुट्यात छाया घरी आली असता तिने आईवडिलांना याची माहिती दिली. यानंतर छायाच्या वडिलांनी तिला सोबत घेत महादू उगले, आण्णा (गणेश) लोखंडे आणि रामधन दळवी या नातेवाईकांसोबत शुभमच गाव गाठलं. मात्र येथे आले असता शुभम वराडेचा फोन बंद होता. खूप प्रयत्न केल्यानंतरही त्याचा संपर्क न झाल्यानं ते परत निघाले. मात्र, यामुळे समाजात आपली बदनामी होईल या कारणाने छायाच्या वडिलांनी सोबतच्या नातेवाईकांच्या मदतीने मेहेगाव शिवारात तिचा गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेह धावडा-मेहेगाव रोडवर टाकून ते घराकडे परतले. पोलिसांनी तीन तासांत तपास करून गुन्ह्याचा छडा लावला. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील समाधान नामदेव डुकरे(वय ४५) , महादू कचरू उगले, आणा पुंजाजी लोखंडे आणि रामधन उत्तम दळवी या चार जणांना अटक केली. मुलीचा वडिलांसर साडू आणि भाच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ================================
    First published:

    Tags: Father, Honor killing, Jalana, Killed Daughter, Ove affair, जालना

    पुढील बातम्या