मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुलीवर प्रेम करतो म्हणून बापाने प्रियकराची हत्या केली आणि जमिनीत गाडले, नांदेडमधील घटना

मुलीवर प्रेम करतो म्हणून बापाने प्रियकराची हत्या केली आणि जमिनीत गाडले, नांदेडमधील घटना

 गावातील  22 वर्षीय मयत तरुण सुर्यकांत जाधव याचे नात्यातील तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. ही बाब मुलीच्या कुटुंबीयांना कळाली तेव्हा...

गावातील 22 वर्षीय मयत तरुण सुर्यकांत जाधव याचे नात्यातील तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. ही बाब मुलीच्या कुटुंबीयांना कळाली तेव्हा...

गावातील 22 वर्षीय मयत तरुण सुर्यकांत जाधव याचे नात्यातील तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. ही बाब मुलीच्या कुटुंबीयांना कळाली तेव्हा...

नांदेड, 29 नोव्हेंबर : आपल्या मुलीवर प्रेम (love affair) करतो म्हणून वडिलांनी तिच्या प्रियकराची (boyfriend) हत्या करून मृतदेह पुरल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये (nanded) उघडकीस आली आहे. तब्बल एक महिन्यानंतर या हत्येचा उलगडा झाला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुखेड तालुक्यातील हासनाळ या गावात ही घटना उघडकीस आली. गावातील  22 वर्षीय मयत तरुण सुर्यकांत जाधव याचे नात्यातील तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. ही बाब मुलीच्या कुटुंबीयांना कळाली तेव्हा त्यांचे संबंध मुलीच्या वडिलांना मान्य नव्हते. त्यामुळे दोन्ही कुटुंबात वाद झाला होता. नात्यातच भांडणं होतील या भीतीने सुर्यकांत याला कुटुंबीयांनी गावातून बाहेर पाठवले होते.

राज्य मंत्रिमंडळाचे चार मोठे आणि महत्त्वाचे निर्णय

पण,  31 ऑक्टोबर रोजी सूर्यकांत गावात आल्याची माहिती आरोपी माधव थोटवे याला मिळाली. त्याने आपल्या मेहुण्याला सोबत घेतले आणि सूर्यकांत जाधव याला रावणगाव शिवारात गाठले. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली त्यानंतर माधव आणि त्याच्या मेहुण्याने मिळून सुर्यकांतला बेदम मारहाण केली आणि त्याची हत्या केली. आपल्या हातून गुन्हा घडल्यानंतर त्याची वाच्यात कुठे होऊ नये म्हणून दोघांनी शिवरातच मोठा खड्डा खोदला आणि  त्याचे प्रेत खोल खड्डाकरून जमिनीत पुरून टाकले.

मयत सुर्यकांतचा भाऊ रवीकांत जाधव याने मुकरामाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मयताचा भाऊ रवीकांत जाधव याने मुलीच्या वडिल माधव थोटवे यांच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यावरून पोलिसांनी आरोपीवर नजर ठेवली. आरोपी माधव थोटवे याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. पण पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवल्या असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

दक्षिण आफ्रिकेतून किती जण मुंबईत आले? आदित्य ठाकरेंनी दिली धक्कादायक माहिती

पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन घटनास्थळी नेले असता मृतदेह जमिनीतून काढण्यात आला. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

First published: