पित्यानं सासुरवाडीहून चिमुकल्याला आणलं घरी; पण रात्रीत जे झालं ते आई कधीच विसरणार नाही

पित्यानं सासुरवाडीहून चिमुकल्याला आणलं घरी; पण रात्रीत जे झालं ते आई कधीच विसरणार नाही

Buldhana News: पत्नीसोबत झालेल्या वादानंतर पतीने सासुरवाडीवरून आपल्या दीड वर्षाच्या मुलाला घेऊन आला होता. पण रात्रीत जे काही घडलं ते आई कधीच विसरणार नाही.

  • Share this:

बुलडाणा, 29 मे: लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षातच संपूर्ण संसार उद्धवस्त झाला आहे. घरगुती वाद विकोपाला गेल्यानंतर काय होतं? याचा प्रत्यय नुकताच बुलडाण्यात घडलेल्या घटनेतून समोर आला आहे. येथील एका व्यक्तीने घरगुती वादातून टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने आपल्या पोटच्या दीड वर्षाच्या मुलाला गळफास देवून मारलं, त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना उघड होताच गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

संबंधित घटना शुक्रवारी रात्री उशीरा बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील कुंदेगाव याठिकाणी घडली आहे. आत्महत्या केलेल्या 30 वर्षीय युवकाचं नाव दिनेश पुंडलिक वानखेडे असं आहे. मृत दिनेश यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा येथील एका मुलीशी झाला होता. लग्नाच्या सुरूवातीचे काही दिवस आनंदात गेल्यानंतर मृत दिनेश आणि त्यांच्या पत्नीत घरगुती क्षुल्लक कारणावरून वारंवार खटके उडू लागले.

सततच्या वादाला कंटाळून दिनेशची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली होती. त्यानंतर मृत दिनेश 27 मे रोजी सासुरवाडीवरून आपल्या मुलाला घेऊन कुंदेगाव याठिकाणी घेऊन आला. त्याच रात्री दिनेशनं कुंदेगाव गावाच्या शिवारात सर्वप्रथम आपल्या दीड वर्षाच्या मुलाला गळफास लावून मारलं. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रात्री उशीरा ही घटना उघड झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. घरातील क्षुल्लक कारणावरून आपल्या पोटच्या दीड वर्षाच्या लेकराला मारून स्वतःही आत्महत्या केल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा-शुल्लक कारणावरुन पत्नीची हत्या, आरोपीने मृतदेहाशेजारी बसून काढली रात्र आणि मग...

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी मृत दिनेशचा भाऊ राजेश वानखेडे याच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: May 29, 2021, 11:12 AM IST

ताज्या बातम्या