मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुलासमोर बापाने इमारतीतून मारली उडी, चिपळूणमधील थरारक घटना LIVE VIDEO

मुलासमोर बापाने इमारतीतून मारली उडी, चिपळूणमधील थरारक घटना LIVE VIDEO

नगरपालिकेच्या सुरक्षारक्षकांनी त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु...

नगरपालिकेच्या सुरक्षारक्षकांनी त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु...

नगरपालिकेच्या सुरक्षारक्षकांनी त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु...

चिपळूण, 10 डिसेंबर : चिपळूणमध्ये (chiplun) आज धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर परिषदेच्या (chiplun nagar palika) इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन मुलांसह वडिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempted suicide) केल्याची घटना घडली आहे. हा सगळा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदेश नलावडे असं या व्यक्तीचं नाव आहे. नंदेश आपल्या दोन्ही मुलांना घेऊन दुपारी नगर परिषदेच्या आला होता. पालिकेमध्ये वादावादी झाल्यानंतर मुलांना घेऊन तो गॅलरीमध्ये आला होता. गॅलरीमध्ये आल्यानंतर त्याने उडी मारण्याची धमकी दिली.

त्यामुळे नगरपालिकेच्या सुरक्षारक्षकांनी त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुलाला गॅलरीमध्ये सोडून त्याने दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. पण वेळीच  मुलांना नगरपालिकेच्या सुरक्षारक्षकांनी पकडून धरले त्यामुळे त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. पण त्याने खाली उडी मारली होती.  पण वेळीच नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या खाली ताडपत्रित पकडून धरली होती, त्यामुळे नंदेशला कोणताही दुखापत झाली नाही. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही मुलांसह नंदेशचा जीव वाचवला.

अनैतिक संबंधातून बाळ जन्मले अन् आईने धावत्या लोकलमध्ये सोडून दिले, पण...

घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरपालिकेच्या सुरक्षारक्षकांनी नंदेशला पोलिसांच्या ताब्यात दिले. घरातील वादाला वैतागून नंदेशने मुलांसह आत्महत्या करणाच्या प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. नंदेशला पोलीस स्टेशनला नेण्यात आले आणि समज देण्यात आला.

First published:

Tags: चिपळूण