मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सुनेला खोलीत कोंडून सासऱ्याचं विकृत कृत्य; हिंगोलीतील धक्कादायक घटना

सुनेला खोलीत कोंडून सासऱ्याचं विकृत कृत्य; हिंगोलीतील धक्कादायक घटना

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Hingoli: हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव याठिकाणी नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका सासऱ्याने आपल्या सुनेला खोलीत कोंडून विकृत कृत्य केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

हिंगोली, 07 डिसेंबर: हिंगोली (Hingoli) जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव याठिकाणी नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका सासऱ्याने आपल्या सुनेचा विनयभंग केला आहे. आरोपी सासऱ्याने सून घरात असताना दरवाजा बंद करून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न (closed door and molest daughter in law) केला आहे. या प्रकरणी पीडित सुनेनं आपल्या सासऱ्या विरोधात नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

सुरेश रामभाऊ पोपते असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. आरोपी पोपते हा सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी 4 डिसेंबर रोजी आरोपी सासरा घरी असताना, त्याची सून घरी आली होती. यावेळी सासऱ्याने आपल्या सुनेशी वाद घातला. 'आमच्या डब्यातील सगळी डाळ तू घेऊन गेलीस' असा आरोप सासऱ्याने आपल्या सुनेवर केला.

हेही वाचा-4 गर्लफ्रेंडच्या प्रेमात आंधळा झाला तरूण; आजीचाच कापला गळा, धक्कादायक खुलासा

डब्यात डाळ आहे का? बघ म्हणत आरोपीनं सुनेला घरात पाठवलं. यावेळी सून घरात गेली असताना अचानक सासऱ्याने घराचा दरवाजा बंद करून घेतला. यानंतर आरोपीनं आपल्या सुनेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. वेळीच प्रसंगावधान दाखवत सुनेनं आरडाओरड केली. यावेळी सुनेचे आई वडील घरात धावून आले. यावेळी आरोपी सासऱ्याने त्यांनाही अश्लील शब्दांत शिवीगाळ केली आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा-27 वर्षीय मॉडेलवर सामूहिक बलात्कार; 2 दिवस हॉटेलमध्ये सुरू होता भयावह प्रकार

ही संतापजनक घटना घडल्यानंतर, घटनेच्या दुसऱ्या दिवशी 5 डिसेंबर रोडी पीडित सुनेनं नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात जाऊन सासरा सुरेश रामभाऊ पोपते याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विनयभंगासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news