'विशिष्ट धर्माला लक्ष्य करणं अयोग्य' : साहित्य संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटोंची स्पष्टोक्ती

'विशिष्ट धर्माला लक्ष्य करणं अयोग्य' : साहित्य संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटोंची स्पष्टोक्ती

"सरकार बदललंय आता पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या नव्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत", असं फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता सांगितलं. संमेलनाध्यक्षपदी ख्रिश्चन धर्मगुरूची निवड अमान्य असल्याचं सांगत काही संघटनांनी विरोध केला होता.

  • Share this:

उस्मानाबाद, 10 जानेवारी : "जेव्हा लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही प्रवृत्ती अवतरते, तेव्हा साहित्यिकांनी स्पष्ट बोलले पाहिजे आणि लिहिले पाहिजे. अशा वेळी मौन राखणे हा भेकडपणा आहे", असं म्हणून साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांनी भूमिका मांडली. धार्मिक अल्पसंख्याक म्हणून असुरक्षित वाटतं का? या प्रश्नावर - 'बिलकुल वाटत नाही', असं सांगणाऱ्या फादर दिब्रिटो यांनी 'नागरिकत्व कायद्यामुळे विशिष्ट धर्माला लक्ष्य करणं योग्य नाही. हिंदुत्ववादी दृष्टिकोनातून राजकारण केलं जातं ते देशाच्या अंतिम हिताचं नाही', असंही ठामपणाने सांगितलं.

93 व्या अखिल भारतीय संमेलनाच्या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून भाषण करण्याआधी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या भाषणामागची भूमिका स्पष्ट केली. त्यांचं लिखित स्वरुपाचं भाषण माध्यमांना उपलब्ध करून देण्यात आलं आहे. त्यामध्ये त्यांनी विचारस्वातंत्र्याच्या बाजूने भूमिका मांडलेली दिसते. मरणदेखील सुंदर आहे. मला जे पटलंय ते मी सांगणार, असं ते म्हणाले. 'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही प्रवृत्ती अवतरते, तेव्हा साहित्यिकांनी स्पष्ट बोलले पाहिजे आणि लिहिले पाहिजे', असं म्हणून त्यांनी लिखित भाषणात समर्थ रामदासांच्या दासबोधातल्या ओळींचा दाखला दिला.

हेही वाचा - 6 वर्षांत 4 ज्येष्ठ विचारवंतांची हत्या, असे आहे औरंगाबाद कनेक्शन!

'जेव्हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच होतो, धर्माच्या नावाखाली भेदाभेद केला जातो, समाजाचे वांशिक शुद्धिकरण करण्याचा निर्णय घेतला जातो, एखाद्या प्रदेशाला नजरकैदेचं स्वरूप येतं, दोष नसताना अश्राप नागरिकांवर उपासमारीची वेळ येते, उपजीविकेचं साधन हिरावून घेतलं जात, तेव्हा विचारवंतांनी आणि साहित्यिकांनी गर्जना केली पाहिजे', असं ते म्हणाले.

पर्यावरण की विकास या प्रश्नावर एबीपी माझाशी बोलताना फादर दिब्रिटो म्हणाले, "विकास हवा, पण पर्यावरणही महत्त्वाचं. हिरवा विकास हवा आहे. सरकार बदललंय आता पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या नव्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत", असं त्यांनी उद्धव ठाकरेंचं (uddhav thackeray) नाव न घेता सांगितलं.

---------------

अन्य बातम्या

JNU वाद: स्मृती इराणींनी दीपिकावर केला हा गंभीर आरोप

वडिलांचं हेल्मेट घालून चिमुकली आली अंत्ययात्रेत, VIDEO पाहून डोळ्यात येतील अश्रू

मांजरीला वाचवण्यासाठी आज्जीने नातवाला 5व्या मजल्यावर लटकवलं, पाहा Shocking Video

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2020 03:35 PM IST

ताज्या बातम्या