Home /News /maharashtra /

कोरोनामुळे वडिलांचा झाला मृत्यू, आता मुलगा मोफत वाटतोय रामबाण औषध!

कोरोनामुळे वडिलांचा झाला मृत्यू, आता मुलगा मोफत वाटतोय रामबाण औषध!

मुंबईतील प्रसिद्ध पुलमोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर यांनी न दिसणाऱ्या शत्रूवर अर्थात कोरोनावर मात केली आहे.

    मुंबई, 25 जून: मुंबईतील प्रसिद्ध पुलमोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर यांनी न दिसणाऱ्या शत्रूवर अर्थात कोरोनावर मात केली आहे. ती म्हणजे कोरोना व्हायरसवर (Coronavirus) रामबाण ठरणाऱ्या 'रेमडेसिवीर' (Remdesivir) या औषधाच्या जोरावर. 'रेमडेसिवीर' मार्केटमध्ये लॉन्च करण्यास भारत सरकारने ग्रीन सिग्नल दाखवला आहे. एका व्यक्तीनं योग्यवेळी 53 वर्षीय डॉ. जलील पारकर यांना 'रेमडेसिवीर' औषध देऊन त्यांना जीवनदान दिलं आहे. दरम्यान, ची मागणी जास्त असल्यानं ते बाजारात सहज उपलब्ध होत नाही आहे. हेही वाचा...कोरोनाची लाट ओसरली! आता या शहरात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही डॉ. जलील पारकर यांनी आतापर्यंत 200 हून जास्त कोरोना रुग्णांवर उपचार केला आहे. मात्र, रुग्णसेवा करताना डॉ. पारकर हे स्वत: कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. गेल्या आठवड्यात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. 'रेमडेसिवीर' या औषधीमुळे डॉ. पारकर यांनी कोरोनावर मात केली. कदाचित, तुम्हाला माहित नसेल, डॉ. पारकर यांना एका व्यक्तीनं 'रेमडेसिवीर' दिलं होतं. या व्यक्तीच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्यावर डॉ. पारकर हेच उपचार करत होते. संबंधित व्यक्तीनं त्याच्या वडिलांना 'रेमडेसिवीर' औषध दिलं, परंतु खूप उशीर झाला होता. डॉ. पारकर यांनी सांगितलं की, या व्यक्तीचे वडील 12 दिवस ICU मध्ये होते. मात्र, त्यांना उशीरा 'रेमडेसिवीर'चा डोस दिला. त्यामुळे त्यांच्यावर मृज्यू ओढवला. मोफत दिली 5 लाखांची औषधी... आतापर्यंत या व्यक्तीनं 5 लाख रुपयांची औषधी मोफत वाटप केली आहे. या औषधीमुळे 25 जणांना जीवदान मिळालं आहे नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर या व्यक्तीनं सांगितलं की, 'रेमडेसिवीर' बांगलादेशात उपलब्ध आहे. त्यांचा एक मित्र त्यांनी कुरिअरने 'रेमडेसिवीर' कोलकाता येथे पाठवतो. नंतर तिथून 'रेमडेसिवीर' मुंबईत येते. बांगलादेशात 'रेमडेसिवीर'च्या एका बाटलीची किंमत 65 डॉलर एवढी आहे. वडिलांना वाचवू शकलो नाही पण, इतरांना कायम मदत करणार असल्याचं या व्यक्तीनं सांगितलं आहे. हेही वाचा..कोरोनावरील उपचारासाठीचं औषध आणि नवी चाचणी, आरोग्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा 'रेमडेसिवीर' रामबाण... अमेरिका, भारत आणि दक्षिण कोरिया कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे या देशांमध्ये 'रेमडेसिवीर'ला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, जापानमध्येही रेमडेसिवीरचा चांगला रिझल्ट मिळाला आहे.  दरम्यान, अमेरिकेनं अद्याप रेमडेसिवीरची किंमत निश्चित केलेली नाही. रेमडेसिवीरची ट्रायल अमेरिका, यूरोप आणि आशियातील 60 सेंटर्समध्ये 1063 रुग्णांवर करण्यात आला होता.
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Coronavirus india, Coronavirus update

    पुढील बातम्या