Home /News /maharashtra /

Navi Mumbai: बापानेच केला पोटच्या मुलीवर बलात्कार, नवी मुंबईतील संतापजनक घटना

Navi Mumbai: बापानेच केला पोटच्या मुलीवर बलात्कार, नवी मुंबईतील संतापजनक घटना

Representative Image

Representative Image

राज्यातच नव्हे तर देशातही दिवसेंदिवस अत्याचार, बलात्कारासारख्या (Physical Abuse Incident in India) धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता नवी मुंबईच्या नेरुळ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

  नवी मुंबई, 20 मे : राज्यातच नव्हे तर देशातही दिवसेंदिवस अत्याचार, बलात्कारासारख्या (Physical Abuse Incident in India) धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता नवी मुंबईच्या नेरुळ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर बापानेच अत्याचार (Sexual Harassment) केल्याचा संतापजनक इथे घडला आहे. याप्रकरणी मंगळवारी नेरुळ पोलीस ठाण्यात (Nerul Police Station) नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम हा एका व्यावसायिकाच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करायचा. तेथेच त्याने आपल्या 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. असा आला प्रकार समोर 42 वर्षीय नराधम स्वयंपाकी म्हणून एका व्यावसायिकाच्या घरी काम करायचा. तो झारखंड राज्यातील रहिवासी आहे. मात्र, ज्याठिकाणी तो काम करायचा तो तेथेच राहायचा. त्याने आपल्या 15 वर्षीय मुलीला आपल्या सोबत नेरुळ येथे आणले. यानंतर नेरुळ येथे राहणाऱ्या व्यावसायिकाच्या घरातच त्याने आपल्या मुलीसोबत हे धक्कादायक कृत्य केले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या मालकिणीला सांगितला. यानंतर हा प्रकार समोर आला. हेही वाचा - पत्नीला बॉयफ्रेंडच्या मिठीत पाहिल्यावर पतीनं लिहिली चिठ्ठी, उचललं धक्कादायक पाऊल घटनेची माहिती मालकिणीला मिळताच त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर नेरुळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संबंधित माहिती मिळताच नराधम बाप फरार झाला आहे. नेरुळ पोलीस त्याचा शोध घेत असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

  'ते घाणेरडा स्पर्श करीत होते', मुलीने ट्रेनमधून मारली उडी

  बिहारमधील (Bihar News) समस्तीपुरमध्ये जनसाधारण एक्सप्रेसमधून घरी जाणाऱ्या एका विद्यार्थिनीने (22) छेडछाडीला त्रस्त होऊन चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात दाखल झाल्यावर विद्यार्थिनीने सांगितलं की, दुपारी 3.15 वाजता बरौली जाण्यासाठी ती जनसाधारण ट्रेनमध्ये चढली होती. जिथं ती बसली होती, तिथं 6 मुलगे होते. ते घाणेरडे कमेंट करीत होते. त्यांना नकार दिला तरी ते घाणेरडा स्पर्श करीत होते. ती त्यांना खूप वैतागली होती. तिची याचा खूप त्रास होत होता. ती गेटच्या जवळ आली.

  मदतीसाठी तिने घरी फोन केला. त्यावेळी ती मुलं फोन खेचू लागले आणि तिला घाणेरडा स्पर्श करू लागले. ट्रेनमध्ये खूप लोक होते. मात्र कोणीच मदतीसाठी पुढे आलं नाही. काय करावं तिला कळत नव्हतं. म्हणून स्वत:ची इज्जत वाचवण्यासाठी तिने धावत्या ट्रेनमधून उडी मारली.

  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime, Police, Sexual harassment

  पुढील बातम्या